आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Imediatly Starts Fodder Comp Order By Raj Thakare For His Followers

चारा छावण्या ताबडतोब सुरू करण्‍याचे राज ठाकरे यांचे पदाधिका-यांना आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दुष्काळग्रस्त भागातील गुरांसाठी चारा छावण्या ताबडतोब उभ्या करण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिका-यांना दिले आहेत. या चारा छावण्यांचा पूर्ण खर्च पक्षातर्फे केला जाणार आहे. तसेच दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी स्वतंत्र यंत्रणाही उभारण्यात आली आहे.

बुधवारी कृष्णकुंज येथे पक्षाच्या आमदार, पदाधिका-यांची तातडीची बैठक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली होती. औरंगाबाद, बीड, जालना, सोलापूर येथील दुष्काळाची तीव्रता असलेल्या गावांमध्ये तातडीने चारा छावण्या उभारण्याचे आदेश ठाकरे यांनी पदाधिका-यांना दिल्याचे समजते. राज यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला होता. जालना येथील सभेत दुष्काळग्रस्तांना मदत करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानुसार राज यांनी
बुधवारी मुंबईत पदाधिका-यांबरोबर बैठक घेतली व दुष्काळग्रस्तांसाठी यंत्रणा राबवण्याचे आदेश दिले.राज यांनी त्यांच्या सभांमधून दुष्काळासाठी भाषणबाजी करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

15 मार्चपासून अंमलबजावणी
सुमारे एक हजार गुरांच्या एका छावणीसाठी महिना 35 ते 45 लाख रुपये खर्च अपेक्षित असून तो सर्व खर्च पक्षाच्या वतीने केला जाणार आहे. येत्या 15 मार्चपासून अंमलबजावणी करण्याचे आदेश राज यांनी दिले आहेत. ज्या भागात दुष्काळग्रस्तांना पक्षाच्या वतीने मदत दिली जाते. संपूर्ण अहवाल पाठवण्याची जबाबदारी पदाधिकारी आणि आमदारांवर सोपवण्यात आली आहे.