आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाेटाबंदीविरुद्ध लढ्यासाठी सज्ज व्हा : उद्धव ठाकरे, त्रस्त व्यापाऱ्यांचे करमाफीसाठी ठाकरेंना साकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘नाेटाबंदीच्या निर्णयामुळे केवळ व्यापारीच नाही तर सर्वसामान्य नागरिक त्रस्त अाहे. मात्र केवळ अासवे गाळत न बसता या निर्णयाविराेधात संघटित लढा देण्याची तयारी ठेवा,’ असे अावाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्यापाऱ्यांना केले.
ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह निर्माण करण्याबराेबरच व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘टॅक्स पॅकेज’ जाहीर करावे यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी गळ या व्यापाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना घातली. दरम्यान, व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा अापण केंद्राकडे पाठपुरावा करू, असे अाश्वासन ठाकरे यांनी या वेळी शिष्टमंडळाला दिले.
फेडरेशन अाॅफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असाेसिएशन या संघटनेच्या वतीने शिवसेनेचे राजकुमार बाफना यांच्या नेतृत्वाखाली विविध उद्याेग क्षेत्रांतील २५ व्यापारी प्रतिनिधींनी ठाकरे यांची ‘माताेश्री’ निवासस्थानी भेट घेतली. यात हाॅटेल, वाहतूक संघटना, घाऊक व्यापारी संघटना, किरकाेळ व्यापारी अादी संघटनांचा समावेश हाेता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी घेतलेल्या नाेटाबंदीच्या निर्णयाला शिवसेनेने यापूर्वीच विराेध जाहीर केलेला अाहे.

व्हॅट, प्राप्तिकर रद्द करा : फेडरेशन अाॅफ ट्रेडर्स वेल्फेअर असाेसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा म्हणाले, नाेटबंदीचा निर्णय चांगला असला तरी त्याचा हाेमवर्क व्यवस्थित केलेला नाही. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात आमचा व्यवसाय चांगला असतो. मात्र, नाेटबंदीमुळे ताे कोलमडून पडला आहे. व्हॅट अाणि प्राप्तिकर रद्द व्हावा, अशी अामची मागणी असून या संदर्भात अाम्ही अगाेदर पंतप्रधानांशी पत्रव्यहार केला अाहे. बहुतांश ग्राहक अापल्याकडील राेख रक्कम फार जपून खर्च करत अाहेत. त्यामुळे व्यापारात मरगळ अाली असून ती अाणखी दाेन ते तीन महिने अशीच कायम राहण्याची शक्यता अाहे. या पार्श्वभूमीवर व्यापारी अाणि ग्राहकांना दिलासा मिळेल, अशी सवलत केंद्र सरकारने जाहीर करावी, अशी मागणी शहा यांनी केली.
‘अाम्हीच माेदींना सत्तेवर अाणले, अन‌् त्रासही अाम्हालाच का?’

मुंबईत जवळपास अडीच लाख लहान व्यापारी असून त्यांच्याकडे अाजघडीला नाेकरांना पगार देण्यासाठीही राेख पैसे नाहीत. पूर्वी बहूतांश व्यवहार राेखीने व्हायचे मात्र अाता नाेटाबंदीनंतर लाेक डेबिट- क्रेडिट कार्डच काढतात. नाहीतर दाेन हजारांची नाेट घेऊन येतात. त्यांना परत देण्यासही सुटे पैसे नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांची अडचण हाेत अाहे. नरेंद्र मोदींना सत्तेवर आणण्यासाठी ज्या व्यापाऱ्यांनी मदत केली होती, आता त्रासही त्यांनाच दिला जात अाहे, अशी भावना व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

सरकारच्या मनमानीविराेधात लढण्याची तयारी ठेवा : ठाकरे
‘सरकारच्या मनमानीचा त्रास केवळ तुमच्याच पिढीला नाही तर नवीन पिढीलाही हाेणार अाहे. तेव्हा अाता गप्प बसून उपयाेग नाही. अासवे गाळत न बसता नाेटाबंदीच्या विराेधात लढण्याची तयारी ठेवा, त्यासाठी संघटित व्हा,’ असे अावाहन उद्धव ठाकरेंनी व्यापाऱ्यांना केले. ‘देशातील जनतेच्या मतांवरच माेदी निवडून अाले अाहेत. काॅंग्रेसच्या कारभाराला जनता कंटाळली हाेती म्हणूनच त्यांना निवडून दिले अाहे. त्यामुळे काेणताही निर्णय घेताना माेदींनी देशातील १२५ काेटी जनतेला विश्वासात घ्यायला हवे. मी सामान्य माणसासाठी लढत अाहे. या निर्णयाविराेधात देशातील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र यावे. जिल्हा बॅंकांवर बंदी अाणली पण या बॅंकेत ज्या शेतकऱ्यांची खाती अाहेत त्यांचे हाल हाेेत अाहेत. जनधन खात्यांवरही सरकारची नजर अाहे, मग ही जनधन याेजना अाणलीच कशाला?’ असा सवालही ठाकरे यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...