आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गव्हावर अायात शुल्क नाही : सीतारामन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गहू अायातीवर शुल्क लागू करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात अाला नसल्याचे वाणिज्य अाणि उद्याेगमंत्री निर्मला सीतारामन यांनी लाेकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले. सध्या गव्हावर काेणतेही अायात शुल्क नाही. देशात अगाेदरच अतिरिक्त साठा उपलब्ध असल्याने स्वस्त अायातीला निर्बंध घालण्यासाठी दहा टक्के शुल्क अाकारण्याचा खाद्य मंत्रालयाचा विचार अाहे. चांगल्या दर्जाचा गहू उपलब्ध नसल्याने व्यापारी माेठ्या प्रमाणावर गहू अायात करीत अाहेत. त्यामुळे सरकारने शुल्क लागू करण्याचा विचार केला अाहे. खासगी व्यापाऱ्यांनी अाॅस्ट्रेलियातून अगाेदरच ५,००,००० टन गहू अायात केला असून अन्य देशांतून अाणखी ५,००,००० टन अायात करण्याचा व्यापाऱ्यांचा विचार अाहे.