आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांचा शब्द म्हणजे आदेशच, वाचा बाळ ठाकरे नावाच्या अजब रसायनाबाबत....

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळासाहेब ठाकरेंचा शब्द, आदेश म्हणजे वाघाची डरकाळी असे मानले जायचे. - Divya Marathi
बाळासाहेब ठाकरेंचा शब्द, आदेश म्हणजे वाघाची डरकाळी असे मानले जायचे.

मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज पाचवा स्मृतीदिन. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब एक वेगळचं रसायन होतं आणि त्यांनी एक वेगळीच राजकीय भूमिका घेऊन पुढे आले. त्यांचे एखाद्याला खुले आव्हान देणे असो की धमकी देणे हा अंदाजच हटके होता. त्यात आपलेपणाही असायचा आणि चीड, रागही असायचा. बाळासाहेब कायम चांदीच्या सिंहासनावर बसायचे आणि त्यांचे कट्टरविरोधी सुद्धा वेळोवेळी मातोश्रीच्या दरबारात हजेरी लावायचे. बाळासाहेबाचा एवढा दरारा होता की, त्यांचा शब्द म्हणजेच आदेश, कायदा असे मानले जायचे. त्यांच्या एका इशा-यावर संपूर्ण मुंबई थांबायची. आज बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त 10 पॉईंट्समधून जाणून घेऊन त्यांच्या व्यक्तीमत्त्वाबाबत...

 

1. कार्टूनिस्ट म्हणून सुरू केले करियर

 

- राजकारणात प्रचंड लोकप्रिय आणि दिग्गज मानले जाणारा हा नेता आपल्या करियरच्या सुरूवातीला एक कार्टूनिस्ट म्हणून काम करायचा. 'द फ्री प्रेस जर्नल' या वृत्तपत्रात त्यांनी पहिल्यांदा काम केले. 
- मात्र, 60 च्या दशकात त्यांची कार्टून 'टाइम्स ऑफ़ इंडिया' संडे एडिशनमध्ये छापली जायची. 1960 मध्ये त्याने ही नोकरी सोडून दिली आणि नंतर पुढे कार्टून वीकली 'मार्मिक' सुरु केले. 

 

2. पित्याच्या आदेशानुसार राजकारणात उडी-

 

- बाळ ठाकरेंनी राजकीय विचारधारा पिता केशव सीताराम ठाकरे यांच्याकडून उचलली. त्यांचे पिता केशव ठाकरे प्रबोधनकार होते.  
- भाषेच्या आधारावर महाराष्ट्राला एक वेगळे राज्य बनविण्याच्या आंदोलनात 'संयुक्त महाराष्ट्र चळवळ' तील केशव सीताराम ठाकरे अग्रणी व लोकप्रिय नेता होते.  
- त्यांनी महाराष्ट्रातील गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीयांचा वाढता प्रभाव पाहून त्यांच्याविरोधात आंदोलन पुकारले. 
- 1966 मध्ये बाळ ठाकरेंनी 'शिवसेना' नावाची संघटना स्थापन केली. जी मराठी लोकांच्या हितासाठी काम करणारी असेल असे जाहीर करून टाकले. 
- आपल्या वेगळ्याच राजकीय शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या बाळासाहेबांनी मराठी लोकांपर्यंत आपला आवाड पोहचावा यासाठी 1989 मध्ये 'सामना' नावाचे वृत्तपत्र सुरू केले. 

 

3. सत्तेत नसूनही चालवले सरकार-

 

- 1995 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीचे सरकार पहिल्यांदा राज्यात आले. या दरम्यान (1995-1999) बाळासाहेब यांनी सरकारमध्ये न राहता आपल्याला हवे तसे सरकार चालवायला भाग पाडले. या कारणामुळे रिमोट कंट्रोलद्वारे चालणारे सरकार हे सुद्धा नाव मिळाले होते. 
- ते स्वत: कोणत्याही पदावर गेले नाहीत मात्र ते कायमच किंग मेकरच्या भूमिकेत राहिले. काहींसाठी महाराष्ट्राचा हा वाघ आपल्यासाठी एक सांस्कृतिक आदर्श होता.

 

4. एक वर्षात दोन धक्के- 

 

- 1996 मध्ये बाळ ठाकरे यांना मोठे धक्के बसले. 20 एप्रिल 1996 रोजी त्यांचे पुत्र बिंदुमाधव यांचे रस्ते अपघातात निधन झाले. तर, त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात पत्नी मीना यांचे हार्ट अटॅकने निधन झाले.  

 

5. मतदान करण्यावर घातली बंदी- 

 

- द्षेचाचे आणि तिरस्काराचे राजकारण केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने बाळासाहेबांना मतदान करण्यावर व निवडणूक लढण्याबाबत बंदी घातली.
- निवडणूक आयोगाने 28 जुलै 1999 रोजी बाळासाहेबांना 6 वर्षासाठी निवडणूक लढविण्यास बंदी घातली. यानंतर 2005मध्ये त्यांच्यावरील बंदी हटल्यानंतर त्यांनी मतदान केले.

 

6. अमराठी लोकांविरूद्ध आंदोलन-

 

- बाळासाहेबांनी मराठी माणसांना एकत्र करत मुंबईत दक्षिण व उत्तर भारतातून येणा-या परप्रांतीय लोकांविरूद्ध  मोर्चा खोलला. सुरुवातीला हटाव लुंगी, बजाव पुंगी आंदोलन करत दक्षिण भारतीय लोकांना लक्ष्य केले नंतर यूपी-बिहारीवर हल्लाबोल केला.

 

7. हिंदूह्दयसम्राट उपाधी मिळवली-

 

- महाराष्ट्रातील मराठी माणसांना एकत्र आणण्यावर पक्ष वाढविल्यानंतर बाळासाहेबांनी 90 च्या दशकात आपला मोर्चा हिंदुत्त्ववादाकडे वळविला. भारतात हिंदूनाच राहण्याचा अधिकार आहे असे सांगत मुस्लिमांविरोधात मोर्चा खोलला. बांगलादेशी व पाकिस्तान धार्जिणे मुस्लिम कायमच त्यांच्या निशाण्यावर राहिले.


- पुढे अयोध्यातील बाबरी मशिद आंदोलनात भाग घेत मशिद पाडण्यास भाग पाडले. भाजप व इतर उजव्या संघटनांनी जेव्हा त्याची जबाबदारी घेण्याचे नाकारले तेव्हा बाळासाहेबांनी माझ्या शिवसैनिकांनी ती मशिद पाडली असे जाहीर सांगितले होते. त्यानंतर ते हिंदूह्दयसम्राट म्हणून देशात नावारूपाला आले.

 

8. दिलेल्या शब्दाचे व मैत्रीचे पक्के होते बाळासाहेब-

 

-बाळासाहेबांनी एकदा एखादा शब्द दिला तरी काहीही झाले तरी ते पाळायचे. त्यात फायदा, नुकसान याचा ते कधीही विचार करायचे नाहीत.
- 1993 च्या बॉम्बस्फोटात संजय दत्तचे नाव आल्यानंतर त्याला तुरूंगात टाका म्हणणारे बाळासाहेब ठाकरेंनी नंतर जा तूला सोडून दिले असे म्हणत त्याला माफी दिली होती. सुनील दत्त व बाळासाहेबांची उत्तम मैत्री होती. केवळ सुनील दत्तच्या शब्दाखातर त्यांनी संजय दत्तला माफ केले होते.

 

9. राष्ट्रापतीवर अवमानकारक टिप्पणी-

 

- मोहम्मद अफजलच्या फाशीच्या शिक्षेबाबत कोणताही निर्णय न दिल्याने बाळासाहेब ठाकरेंनी तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या वादग्रस्त व अवमानकारक टिप्पणी केली होती. 
- वर्ष 2007 मध्ये एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हिटलरचे कौतूक केल्याने बाळ ठाकरेंना लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता.

 

10. व्हॅलेंटाईन डे ला विरोध-

 

- व्हॅलेंटाईन डे हिंदू धर्म आणि संस्कृतीला धोका असल्याचे सांगत त्याला विरोध केला. ज्या हॉटेलात कपल, तरूण मुले-मुली दिसली की तेथील दुकान, हॉटेलात बाळासाहेबांच्या आदेशाने शिवसैनिक तोडफोड करायचे. काही वेळा शिवसैनिक त्या तरूण मुला-मुलींना मारहाण करायचे व जोडप्यांची धिंड काढायचे. यामुळे लोकांत शिवसेनेविषयी नाराजी होती. मात्र, आता शिवसेनेने काळानुसार अशा गोष्टींना विरोध करणे सोडून दिले आहे.


 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, बाळासाहेबांच्या आयुष्याशी संबंधित काही फोटोज ...

बातम्या आणखी आहेत...