आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यातील विस्फोटकांचे गूढ उकलले, जुन्या बिझनेस पार्टनरला दहशतवादी ठरवण्यासाठी रचला कट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ठाणे शहरात सोमवारी एका भंगार कारमधून बॉम्ब सापडल्याच्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. पोलिसांना याची माहिती देणाऱ्या व्यक्तीने वैयक्तिक दुश्मनीवरून एका गॅरेज मालकाला फसवण्यासाठीच हा कट रचल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सूचना देणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या दोन मित्रांनाही अटक केली आहे.
 
असा हस्तगत केला बॉम्ब 
- ठाणे येथे राहणारा महिसा राजेसाहेब नावाच्या या व्यक्तीने आपल्या जुन्या बिझनेस पार्टनर इस्माईल शेखला फसवण्यासाठी एक मोठा कट रचला.
- त्याने आपल्या दोन साथिदारांना शहा आलम शेख आणि आरिफ नवाब अली खान यांच्या साहाय्याने 10 किलो अमोनियम नायट्रेट आणि 9 डिटोनेटर मागवले आणि आपल्या माजी पार्टनरच्या भंगार झालेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये लपवले.
- यानंतर याची माहिती पोलिसांना तसेच आरपीएफला कळवली. तथापि, महाराष्ट्रात रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हायअलर्ट जारी करण्यात आला होता. 
- माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्वरित अॅक्शन घेत छापा टाकला आणि कारमधून विस्फोटक जप्त केले.
 
असा झाला प्रकरणाचा उलगडा
- ठाण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी म्हणाले की, विस्फोटक हस्तगत करून लगेच तपासाला सुरुवात झाली. कारमालकाच्या चौकशीत कळले की, महिसा राजे त्याचा जुना पार्टनर आहे. दोघेही स्क्रॅप कार विकण्याचे काम करायचे. बिझनेस तोट्यात होऊ लागल्यानंतर दोघेही वेगळे झाले.
- महिसा राजेने इस्माईलचे बरेचसे पैसे हडप केले होते आणि मागितल्यावर सारखा अडकवण्याची धमकी देत होता.
- यानंतर पोलिसांनी महिसा राजेला ताब्यात घेऊन चौकशी केली. आणि काही वेळ चौकशी केल्यावरच महिसा राजेने आपला गुन्हा कबूल केला.
- राजेच्या माहितीवरून त्याच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. अवैधरीत्या खोदकाम करणाऱ्या भूमाफियांच्या मदतीने डिटोनेटर आणि अमोनिअम नायट्रेट यासारखे विस्फोटक महिसा राजेने मिळवले होते, हेही तपासात समोर आले आहे.
 
हेही वाचा
बातम्या आणखी आहेत...