आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Congress One Leader,but Nationalist Many:manikrao Thakare To Pawar

काँग्रेसचा एकच नेता, राष्ट्रवादीमध्ये संभ्रम : माणिकराव ठाकरेंचा शरद पवारांना टोला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्वाची धुरा देण्यावर काँग्रेसमध्ये कोणाचेही दुमत नाही. राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र सुप्रिया सुळे की अजित पवार अशी संभ्रमावस्था असेल, असा टोला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना सोमवारी लगावला. शिवाय शिवसेनेने आपल्या पक्षाबाबत चिंतन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. राहुल यांच्या उपाध्यक्षपदी नेमणुकीनंतर पवार यांनी राष्‍ट्रवादीवर अजून सुप्रियाकडे नेतृत्व देण्याची वेळ आली नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर ठाकरे बोलले आहेत.

12 सिलेंडरची मागणी
केंद्र सरकारने अनुदानावर 9 सिलिंडर देण्याचा निर्णय घेतल्यानंतर संयुक्त कुटुंबांना 12 सिलिंडर देण्याचे सुतोवाच राष्‍ट्रवादी काँग्रेसने केले. त्यास काँग्रेसनेही पाठिंबा दिला. 12 सिलिंडर द्यायला हवेत. कॅबिनेट बैठकीत चर्चा करून यावर निर्णय व्हावा, असे माणिकराव यांनी स्पष्ट केले .