आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात मद्यपी दरवर्षी ढोसतात 2 लाख कोटी रुपयांची दारू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/दिल्ली - मीवयाच्या १९ व्या वर्षी पहिल्यांदा मद्यसेवन केले. नंतर कधी-कधी घेऊ लागलो. एमबीबीएस झालो अन् पदव्युत्तर शिक्षणासाठी इंग्लंडला गेलो. तिथे शिक्षणाशिवाय करण्याजोगे अन्य काही नसल्याने एकटाच मद्य प्यायचो. हळूहळू ती सवयच बनली. दरम्यान, लग्न होऊन मुलेही झाली. २००५ मध्ये तर मी रुग्णालयात जाणेही बंद करून टाकले. डोळ्याला चष्मा लावला, रक्तदाब वाढला, फुप्फुस खराब झाले आणि अनेक आजारही जडले. त्यामुळे लग्न मोडण्याची वेळ आली. २००७ मध्ये मित्र आणि कुटुंबीयांनी मला बंगळुरूतील पुनर्वसन केंद्रात पाठवले. सुरुवातीला खूप त्रास झाला. मात्र, हळूहळू २४ वर्षे जुनी ही सवय मोडली. मागच्या ९ वर्षांत मी दारूचा थेंबही घेतला नाही. हा भोग भोगणाऱ्या पुण्यातील डॉ. मिहिर वोरा ( जागा स्थान बदलले आहे) यांच्यासारखा नशीबवान नसतो. एकदा नकार देऊनही पुन्हा मद्यसेवन करणाऱ्यांची संख्या देशात ७० टक्के असून फक्त ३० टक्के लोकच कायमची दारू सोडतात. सुमारे ५० टक्के लोक तर ९० दिवसांच्या आतच पुन्हा ढोसायला सुरुवात करतात. तर, एक टक्क्यापेक्षाही कमी लोक स्वत:हून दारू सोडवण्याठी पुनर्वसन केंद्रात जातात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते भारतात सुमारे ३२ टक्के पुरुष आणि ११ टक्के महिला मद्यसेवन करतात. संविधानाच्या मार्गदर्शक घटकांत मद्यसेवन करण्याची मनाई आहे. मद्यविक्रीच्या बाबतीत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. या क्षेत्राशी संबंधित व्यक्तींच्या मते, २०१५-१६ या आर्थिक वर्षात देशातील मद्य व्यवसायात सुमारे २८ ते ३१ अब्ज डॉलरची (१.८६ ते २.०६ लाख कोटी रुपये) उलाढाल झाली. यात विदेशी मद्य (भारतात उत्पादित विदेशी दारू, बीआयओ) १७ अब्ज डॉलर, बिअर अब्ज डॉलर देशी दारूचा अब्ज डॉलरचा व्यवसाय झाला. २००१ ते २०११ दरम्यान मद्यव्यवसायात १२ टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली गेली. २०१३ मध्ये त्यात २-३ टक्क्यांची घट झाली. महागाई, जाहिरातीवरील बंदी, राज्य सरकारांचे नियम, करामुळे मद्यप्रमाण घटले आहे. २०१९ पर्यंत विदेशी मद्य २६ अब्ज डॉलर आणि बिअरचा व्यवसाय ११.९ अब्ज डॉलरवर जाईल, असा अंदाज आहे. २०१४-१५ वर्षात ३५४ कोटी लिटर मद्यसेवन केले गेले. देशात सुमारे २० प्रमुख कंपन्या या व्यवसायात सक्रिय असून ५५ हजार मद्यविक्री दुकाने आहेत. मद्यसेवन सोडण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देणाऱ्या अल्कोहोलिक अॅनाॅनिमस समूहाचे विश्वस्त पुशान यांच्या मते, मद्यपींमध्ये १० टक्के लोक दिवसातून अनेकदा किंवा एकदाच अनेक पेग ढोसतात. कायमची दारू सोडणाऱ्यांचे सुरुवातीचे ९० दिवस खूप महत्त्वाचे असतात. मद्यपीने सतत वर्षे मद्यसेवन केल्यास तो दारूकडे पुन्हा वळण्याची शक्यता एक टक्क्यापेक्षाही कमी राहते.
पुढे वाचा... मद्यसेवन कोण करतो?
बातम्या आणखी आहेत...