आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कैद्यांना कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी व्हिडिओ कॉलिंग; या कारणामुळे सरकारने घेतला निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येरवडा जेल. - Divya Marathi
येरवडा जेल.

मुंबई- जेलमधील कैद्यांना दूरवर असलेल्या कुटुंबीयांशी संपर्क साधता यावा, यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून कैद्यांना आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आप्तेष्टांशी बोलता येणार आहे.

 

दोषी सिद्ध झालेल्या कैद्यांसाठी सुविधा

मुंबईतील भायखळा जेलमध्ये मंजुळा शेट्येच्या झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दोषी सिद्ध झालेल्या कैद्यांनाच व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबीयांशी बोलता येईल, म्हणजेच अंडर ट्रायल कैद्यांना ही सुविधा उपलब्ध नसेल, असे सांगण्यात येत आहे.

 

का घेण्यात आला हा निर्णय?

मुंबईतील तुरुंगांमध्ये अनेक कैद्यांचा भरणा होतो. तुरुंगातील गर्दीमुळे काही कैद्यांना येरवडा, तळोजा किंवा औरंगाबादसारख्या लांबवरच्या जेलमध्ये हलवण्यात येते. मात्र अंतरामुळे अशा कैद्यांच्या कुटुंबीयांना भेट घेण्यात अडचण येते. कैद्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना दूरवर प्रवास करुन रांगेत उभे राहावे लागते. मात्र आता कुटुंबीयांची ही दगदग टळणार आहे.

 

महिन्यातून एकदाच बोलता येणार

महिन्यातून एकदाच दहा मिनिटांसाठी कुटुंबीयांना कैद्याशी बोलता येईल. यासाठी त्यांना जवळच्या जेलशी संपर्क साधावा लागेल. जेलमध्ये असलेल्या नातेवाईकाशी बोलण्यासाठी नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतर जिल्हा कोर्टाकडून मान्यता मिळेल. त्यानंतर कैद्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रुममध्ये नेण्यात येईल. यासाठी कुटुंबीयांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...