आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात करण्यात येत आहेत महिलांनी वापरलेले सॅनिटरी नॅपकिन जमा; हे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आपल्या देशात मासिक पाळीवर बोलणेही वर्ज्य मानले जाते. पण त्यावेळी तुम्हाला असे कळाले की महिलांनी वापरलेले सॅनिटरी नॅपकिन जमा करण्यात येत आहेत. तर तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल की असे का करण्यात येत आहे. महिलांमध्ये वाढत चाललेला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजेच सर्व्हायकल कॅन्सर हे याचे कारण आहे.
 
महिलांचा बोलण्यातील संकोच हा मुख्य अडथळा
ग्रामीण महाराष्ट्रातील महिलांच्या आरोग्याच्या स्थितीचा विचार केल्यास डॉक्टरांपुढे सगळ्यात मोठे आवाहन हे त्याचा लाजाळू स्वभाव हे ठरत आहे. महिला आपल्या समस्या मांडताना संकोच करतात. त्यामुळे त्याच्या आरोग्याची नीट तपासणी करता येत नाही ही बाब लक्षात घेऊन ही सॅनिटरी नॅपकिन्स जमा करण्यात येत आहेत. टाटा मेमोरियल सेंटर आणि राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेतील वैज्ञानिक महिलांनी वापरलेल्या सँनिटरी नॅपकिनवर असलेल्या रक्ताच्या डागांचा अभ्यास करुन हे संशोधन करत आहेत. यात एचपीवी इंफेक्शन की तपासणीही करण्यात येते हे सर्व्हायकल कॅन्सरचे मुख्य कारण मानले जाते. 
 
कशा पध्दतीने पोहचतात समस्या असलेल्या महिलांपर्यंत
या संशोधनासाठी 30 ते 50 टक्के या वयोगटातील महिलांची निवड करण्यात आली. या महिला मानसिक आणि शारिरिकदृष्टया सशक्त होत्या. त्यांची मासिक पाळी नियमित होती. त्यांच्याकडून 2 वर्षे नियमित सॅनिटरी नॅपिकिन घेण्यात आले. हे नॅपकिन उणे 20 डिर्ग्री तापमानात ठेवण्यात आले. त्यानंतर एचपीवी तपासणीसाठी बर्फाच्या कंटेनरमध्ये ठेऊन हा कंटेनर संशोधन केंद्रावर पाठवण्यात आला. या दरम्यान 24 महिला एचपीवी पॉझिटिव्ह सापडल्या. त्यांच्यावर आता पुढील उपचार करण्यात येणार आहेत.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...