मुंबई- मुंबईसह उपनगरात काल (मंगळवारी) नऊ तासांत 12 इंच पाऊस झाला. बेभान कोसळणार्या पावसाने अगदी होत्याचे नव्हते केले आहे. मुंबईकरांनी 26 जुलै 2005 ची पुनरावृत्ती अनुभवली. पावसामुळे लाखो चारकमाने बेहाल झाले. काही जण तर अजूनही घरी पोहोचलेले नाहीत.
तुमचा नातेवाईक किंवा मित्रमंडळीतील कुणी बेपत्ता असेल तर आम्हाला माहिती द्या,
असे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्यांचे फोटो आणि त्यांची माहिती सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवू आणि शोध घेण्यास मदत करु, असे म्हटले आहे.
बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर बेपत्ता...- बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. दीपक आमरापूरकर मंगळवारपासून बेपत्ता आहेत. डॉ.आमरापूरकर परळ भागातून बेपत्ता झाले आहेत.
- मुलुंडहून बोरिवलीकडे निघालेले 80 वर्षाचे माधव वैद्य हे बेपत्ता होते. ते सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडले. दुपार झाली तरी ते घरी परतले नव्हते. मात्र, ते सुखरुप असल्याचे वृत्त आहे.
- दहिसर परिसरात कालच्या पावसात दोघेजण वाहून गेले. प्रतीक घाटले आणि गौरेश अशी या दोघांची नाव आहेत. गौरेशला वाचवण्यात यश आले असून प्रतीक घाटले अद्यापही बेपत्ता आहे.
- कांदिवलीच्या महिंद्रा कंपनीजवळच्या नाल्यात ओमप्रकाश निर्मल हा 26 वर्षीय तरुण वाहून गेला आहे. त्याचाही शोध घेतला जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... तुंबलेल्या मुंबईचे फोटोज...