आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In School Text Book There Is Lesson On Sachin, School Education Minister Information

शाळेच्या पाठय़पुस्तकात सचिनवर धडा, शालेय शिक्षणमंत्री यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्यावर शालेय पाठय़पुस्तकात एक पाठ घेण्यात येईल, अशी माहिती सोमवारी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिली. सचिनची महती सांगणारा पाठ शालेय अभ्यासक्रमात लावावा, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेने केली होती. या मागणीला राज्यातील शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला होता.
सचिन महान खेळाडू आहे. त्याच्या देदीप्यमान कारकीर्दीची माहिती विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे या मागणीचा शालेय शिक्षण विभाग निश्चितच गंभीरपणे विचार करेल, असे दर्डा यांनी सांगितले. यासाठी लवकरच बालभारतीच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही दर्डा यांनी म्हटले आहे.