आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In State All Agricultur Committe Frame The Aid Plan : Vikhe Patil

राज्यातील सर्व बाजार समित्यांना मदतीचा आराखडा सादर करावे : राधाकृष्ण विखे पाटील

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारबरोबरच पणन विभागानेही मदत करावी, अशी भूमिका कृषी आणि पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे. त्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांना येत्या सात दिवसांत मदतीचा आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याचा शासनाच्या मदतीशी संबंध नसल्याने या अतिरिक्त मदतीमुळे शेतक-या ना दिलासाच मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

राज्यातील दुष्काळी भागात यंदा पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. विशेषत: मराठवाड्यातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच म्हणजे 300 बाजार समित्यांनी मदतीचा हात देऊन दुष्काळग्रस्त भागातील शेतक-या ना दिलासा द्यावा. या तालुका बाजार समित्या आपापल्या तालुक्यातील शेतक-या ना कशा स्वरूपात मदत करू शकतात याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

चारा द्या, पाणी पुरवा
बाजार समित्यांनी त्यांच्या तालुक्यातील शेतक-या ना पाण्याचे टँकर्स, जनावरांना चारा पुरवण्यासाठी मदत करण्यावर भर द्यावा. तसेच विद्यार्थ्यांना जेवण पुरवण्याबाबत कोणती उपाययोजना करता येऊ शकते का याचाही विचार करावा याबाबतचे पत्र संबंधितांना पाठवले आहे. तसेच जिल्हा उपनिबंधक, पणन व्यवस्थापक यांनी बाजार समित्यांची बैठक घेऊन याबाबतची माहिती देण्याचे आदेशही विखे यांनी दिले आहेत.