आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात दर महिन्याच्या २१ तारखेला योग दिन - राज्य सरकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील शाळा, महाविद्यालये अाणि विद्यापीठांमध्ये प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला योग दिन साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय व उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली योग समिती, समर्थ व्यायाम मंदिर, भारत स्वाभिमान न्याससह अन्य संस्थांची यासंदर्भात बैठक घेतली. प्रत्येक वर्षी १२ ते २१ जानेवारीदरम्यान योग महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक योग समिती स्थापन केली जाणार आहे. राज्य स्तरावर स्थापण्यात आलेल्या समित्या या समित्यांवर देखरेख आणि समन्वय ठेवतील, असे तावडे म्हणाले. योग चिकित्सेला प्रोत्साहन देण्याचे आवाहनही तावडे यांनी योग संस्थांना केले.
बातम्या आणखी आहेत...