आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • In The Name Of Chief Minister Quota,25 People Cheated

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री कोट्यातून फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली 25 जणांना गंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुख्यमंत्री कोट्यातून फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली 25 जणांना गंडा घालणा-या चार जणांच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संतोष शिर्के असे टोळीच्या सूत्रधाराचे नाव असून तो पत्नीसह
फरार झाला आहे.

बोरिवली आणि अंधेरी येथे एक लाख ते पाच लाखांपर्यत कोट्यातून सदनिका मिळवून देऊ, असे आमिष शिर्के याने गुंतवणूकदारांना दाखवले होते. आपण उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असल्याची थापही त्याने मारली होती. या कामासाठी त्याने एक लाल दिव्याची कारही दिमतीला घेतली होती. 25 जणांकडून पैसे उकळल्यानंतर शिर्केने त्यांना मंत्रालयातील बनावट कागदपत्रे दिली होती. मात्र, कागदपत्रे बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी शिर्के आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार या भामट्यांचा शोध सुरू असल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त भावेंद्र देशपांडे यांनी सांगितले.