आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिग्गजांच्या उपस्थितीत जिओ गार्डनचे लोकार्पण, अंबानी, सचिन, बिग बींची उपस्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात पहिल्या पर्यावरणपूरक, अत्याधुनिक "जिओ गार्डन' सार्वजनिक कार पार्किंग सेवेचे लोकार्पण बुधवारी झाले. या वेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, नीता अंबानी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगपती मुकेश अंबानी, बिग बी अमिताभ बच्चन या दिग्गजांची उपस्थिती होती.
मुंबईच्या मध्यवर्ती भागातील बीकेसीमध्ये आल्हाददायक हिरवळ, वैशिष्ट्यपूर्ण आर्किटेक्चर आणि शानदार लँडस्केपिंग करून हे सुंदर गार्डन तयार करण्यात आले आहे. ते मायानगरी मुंबईची नवी ओळख ठरणार आहे.
कार पार्किंग ही मुंबईची मोठी समस्या. जिओ गार्डनमध्ये एकाच वेळी २००० हून अधिक कार पार्किंग करण्याची सुविधा आहे. ३७००० चौरस फूट क्षेत्रफळावर विस्तारलेल्या या गार्डनमध्ये २००० झाडे लावण्यात आली आहेत. गार्डनमध्ये वाय- फाय सुविधा आहे. तसेच फुटबाॅलचे कृत्रिम टर्फही उभारण्यात अाले अाहे.
बातम्या आणखी आहेत...