आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आमदार पप्पू कलानीला इंदर भतिजा हत्येप्रकरणी जन्मठेपीची शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील व्यापारी इंदर भतिजा यांच्या हत्याप्रकरणी कल्याणमधील सेशन कोर्टाने माजी आमदार पप्पू कलानी याच्यासह चार जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनविण्यात आली आहे. मागील आठवड्यात भतिजा हत्येप्रकरणी कलानीसह इतर चोघांना कोर्टाने दोषी ठरवले होते. दरम्यान, कलानीला जन्मठेपेची शिक्षा झाल्याने उल्हासनगरमधील गुन्हे जगतातील वातावरण ढवळून निघाले आहे.
कल्याणमधील व्यापारी इंदर भतिजा यांची 28 एप्रिल 1990 रोजी त्यांच्या कार्यालयात गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे इंदर यांचा त्यांचा संरक्षण करणार्‍या घनश्याम बेंद्रे या पोलिसाची रायफल खेचून इंदर यांना खून करण्यात आला होता. याप्रकरणी इंदर यांचे बंधू कमल बठिजा यांनी केलेल्या तक्रारीवरून तत्कालीन आमदार पप्पू कलानी याच्यासह हत्येची सुपारी घेणा-या बाबा गॅब्रिअल, बच्ची पांडे, हर्षद शेख व षड्यंत्रात सहभागी असणारे डॉ. नरेंद्र रामसिंघानी, रिचर्डस् यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कल्याण सेशन कोर्टात गेल्या शुक्रवारी इंदर भतिजा हत्या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यात पप्पू कलानी, बाबा ग्रॅबिअल, बच्ची पांडे, हर्षद शेख यांना न्यायाधीश राजेश्‍वरी बापट सरकार यांनी दोषी ठरवले असून डॉ. नरेंद्र रामसिंघानी, रिचर्डस् यांना निर्दोष ठरवले आहे. या सर्व दोषींना आधारवाडी कारागृहात ठेवण्यात आले होते अखेर आज शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
कलानी याच्यावर इंदर भतिजा यांच्या हत्येशिवाय इतर अनेकही गुन्हे त्याच्या नावावर आहेत. यात अण्णा शेट्टी, घनश्याम भतिजा, माऊली जाधव यांच्या हत्याचा आरोप पप्पू कलानीवर ठेवण्यात आले होते. याचबरोबर जे. जे. हत्याकांड, आर्किटेक्ट सोळेसार यांच्या कार्यालयासमोर बॉम्बस्फोट, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे पप्पू कलानी यांच्यावर नोंदवण्यात आले होते. कलानीला माऊली जाधव खूनप्रकरणी नोव्हेंबर 1992 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याप्रकरणी कलानी 9 वर्षे पुण्याच्या येरवडा जेलमध्ये बंद होता. त्याच्यावर सात टाडाचे गुन्हे लावण्यात आले होते. मात्र, टाडासह अनेक गुन्ह्यात कलानी निर्दोष ठरला होता. मात्र, माऊली जाधव, घनश्याम भतिजा हत्या प्रकरणे अजून न्यायप्रवीष्ट आहेत. आता त्याआधीच इंदर भतिजा यांच्या हत्येप्रकरणी कलानी दोषी ठरलाआहे व त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आहे.