आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत आणि चीनने एकमेकांना पराभूत करणे अशक्य, मुंबईत दलाई लामांनी दिला शांततेचा संदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
मुंबई - भारत आणि चीनमध्ये सीमावादावरून संघर्षमय परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहता सर्वोच्च तिबेटिन बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी आपले विचार मांडले. भारताने चीनला किंवा चीनने भारताला पराभूत करणे शक्य नाही. दोन्ही देशांचे लष्कर शक्तीशाली आहे. दोन्हीकडून फायरिंगच्या घटना घडतात, मात्र यामुळे काहीही फरक पडत नाही. दोघांनीही एकमेकांचे चांगले शेजारी होऊन राहावे आणि 'हिन्दी-चिनी भाई-भाई' चे ब्रिदवाक्य पुढे न्यावे असा शांततेचा संदेश दलाई लामा यांनी दिला आहे. ते सोमवारी मुंबईतील कार्यक्रमात बोलत होते. 
 

- भारत-चीन सीमावादावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले, ''1951 मध्ये तिबेटमध्ये शांततेसाठी चीनसोबत 17 कलमी ठराव मंजूर झाला. आज चीन बदलत आहे आणि जगातील सर्वात मोठा बौद्ध धर्मीय देश म्हणून पुढे येत आहे. तेथे कम्युनिस्टांचे सरकार आहे. तरीही तेथील लोकांनी बौद्ध धर्माचा पुढे येऊन स्वीकार केला. भारत आणि चीनला हिन्दी-चिनी भाई-भाई चा रस्ता पुन्हा अवलंब करावा लागणार आहे.''
- ''यापूर्वी दलाई लामा धार्मिक आणि राजकीय अशा तिबेटच्या दोन्ही प्रकरणांचे प्रमुख होते. मात्र, 2011 नंतर मी राजकारणाला आपल्यापासून वेगळे करण्याचा निर्णय घेतला.''
 
बातम्या आणखी आहेत...