आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1962 WAR: असा झाला भारत-चीनमधील सीमावादाचा स्‍फोट; जवानांच्या अंगावर कपडेही नव्हते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चीनने आजच्याच (20 ऑक्‍टोबर 1962)  दिवशी लडाखमध्ये आक्रमण केले होते. सीमावादातून भारत- चीनमध्‍ये पेटलेले युद्ध जवळजवळ महिनाभर चालले होते. अचानक 20 नोव्‍हेंबरला चीनच्या लष्कराने एकतर्फी युद्धविरामाची घोषणा केली होती. चीन तेव्हाही शक्तिशालीच होते. ते पूर्ण तयारीने युद्ध भूमीत उतरले होते. त्‍या तुलनेत भारतीय जवानांकडे शस्त्रास्त्रे तर सोडात त्यांच्याकडे अंगावर घालण्यासाठी उबदार कपडेही नव्हेत. त्यात सरावाचा अभाव. परिणामी भारताला या युद्धात पराभव पत्‍करावा लागला होता.

असा झाला सीमावादाचा स्‍फोट
चीनने तिबेटवर ताबा घेतला तेव्‍हापासून चीन-भारत यांच्यातील सीमावादाचा प्रश्‍न निर्माण झाला नि हा वाद वाढत गेला. मॅकमेहान या ब्रिटिश अधिकार्‍याने आखलेली सीमारेषा ही तिबेट भारत सीमारेषा आहे. याचा वादाचा स्‍फोट म्‍हणजे 20 ऑक्‍टोबर 1962 चे युद्ध समजले जाते. चीनला तोंड देणे भारतीय लष्कराला शक्तिपलीकडचे झाले होते. तेव्‍हा राजकारणी व सनदी अधिकारी हे जवानांच्या समस्या किंवा त्‍यांच्‍या ज्ञान- तंत्रज्ञानाचा फार विचार करत नसत. या अज्ञानामुळे ते राजकीय निर्णय घेताना जवानांना विचारात घेत नसत. त्यामुळेच या सीमावादाच्या युद्धात भारताला पराभव स्‍विकारावा लागला होता.

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, भारत चीन युद्धाशी संबंधित काही खास बाबी....
बातम्या आणखी आहेत...