आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिश्रीमंतांच्या यादीत भारत आठव्या स्थानी, देशात 14,800 गर्भश्रीमंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जगातील गर्भश्रीमंतांमध्ये भारत आता आठव्या स्थानावर आला आहे. देशभरात जवळपास 14,800 गर्भश्रीमंत असल्याचे एका अहवालात दिसून आले आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने 2,700 गर्भश्रीमंतांची नोंद करीत गर्भश्रीमंतांच्या जागतिकस्तरावरील अव्वल 25 शहरांमध्ये स्थान पटकावले आहे. हॉँगकॉँग 15,400 अतिश्रीमंतांची नोंद करून अव्वल शहर म्हणून ओळख निर्माण केली आहे.जागतिक पातळीवरील गर्भश्रीमतांमध्ये भारत आठव्या स्थानावर असला तरी गर्भश्रीमंतांची सर्वाधिक संख्या असलेल्या अव्वल 30 शहरांमध्ये मुंबई हे एकमेव देशातील शहर ठरले असल्याचे न्यू वर्ल्ड वेल्थने केलेल्या एका अभ्यासात म्हटले आहे. यंदाच्या जूनपर्यंत जगभरात केवळ 13 दशलक्ष गर्भश्रीमंत आहेत.