आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिसेंबरपासून तुमची प्रायव्हसी धोक्यात; फोन, मोबाईल, इंटरनेट सर्वांवर असेल नजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - येणा-या काही दिवसांत तुम्ही कोणतीही बाब लपवून ठेवू शकणार नाही. तु्म्ही लँडलाइन फोनवर बोला किंवा मोबाईलवर. तुमचा प्रत्येक कॉल ऐकला जाणार आहे आणि गरज पडली तर रेकॉर्डही केला जाईल. इंटरनेटवरील कोणतीही गोष्ट लपून राहाणार नाही. या केवळ गप्पा नाही तर सत्य आहे. येत्या डिसेंबर पर्यंत सरकार या सर्वांची अंमलबजावणी करणार आहे.

या प्रणालीला सीएमएस (कम्‍युनि‍केशन मॉनीटरिंग सि‍स्‍टीम) असे नाव देण्यात आले आहे. याद्वारे व्हाईस कॉल, फॅक्स मॅसेज, एसएमएस, एमएमएस यांच्यासह फोन नेटवर्कसंबंधी सर्व बाबींवर नजर ठेवली जाणार आहे.
याद्वारे इंटरनेवर तुमच्याकडून ज्या-ज्या गोष्टी केल्या जातील त्या रेकॉर्ड केल्या जाणार आहेत. दोन वर्षांपूर्वीच सुरु झालेली सीएमएस यंत्रणा अतिशय चोख मानली जात आहे. इंटरनेटवरील तुमची छोट्यातील छोटी बाब यावर रेकॉर्ड केली जाऊ शकते. त्यामुळे इंटरनेटवर याची कऱडी नजर राहाणार यात शंका नाही.

टेंडरमध्ये नमुद करण्यात आले आहे की, ही प्रणाली प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करून जतन करु शकते आणि पुन्हा ऐकता किंवा पाहाता येईल. सीएमएस पूर्णपणे तयार झाले आहे. या महिन्याच्या दहा तारखेला त्याची चाचणी केली जाणार आहे. या चाचणी यशस्वी झाली तर येत्या डिसेंबरपासून ही प्रणाली लागू केली जाईल.