आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Pakistan Match Should Play, Shiv Sena Not Correct Danve

पाकशी सामने झालेच पाहिजेत, शिवसेनेचे आंदोलन चुकीचे - रावसाहेब दानवेंचे परखड मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारत- पाकिस्तान क्रिकेट सामने घेण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मात्र आपल्याच सत्तेतील मित्रपक्षाच्या या भूमिकेला विरोध केला आहे. ‘भारत-पाकिस्तान क्रिकेटकेट सामने झालेच पाहिजेत,’ असे परखड मत दानवे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

‘कला- क्रीडा- संस्कृती क्षेत्राच्या माध्यमातून दोन्ही देशांचे संबंध सुरळीत होण्यास मदत होत असेल तर हा मार्ग योग्यच आहे. आपले कलाकार व खेळाडूही देशाबाहेर जातात. मुंबई पाकिस्तानचा सामना झाल्यास भाजप सरकार या सामन्याला संरक्षण देईल’, असे दानवे म्हणाले. विरोध पक्षात असताना भाजपनेही पाकिस्तानबरोबर सामने घेऊ नयेत, अशी भूमिका घेतली होती, ती आता का बदलली? या प्रश्नावर दानवेंनी उत्तर देण्याचे टाळले.