आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- आदर्श घोटाळ्यात राज्यपालांनी अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यास परवानगी नाकारल्याबाबत महायुतीचे नेते थेट राष्ट्रपतींकडे तक्रार करणार आहेत. मंगळवारी भाजप नेते अरुण जेटली यांच्या नेतृत्वात महायुतीचे प्रमुख नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. राज्यपालांकडे वारंवार तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने आता थेट राष्ट्रपतींकडेच दाद मागणार असल्याचे महायुतीतर्फे सांगितले आहे.
आदर्श घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर ठपका ठेवला आहे. तरीही कारवाई होऊ नये यासाठी प्रयत्न करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी हे नेते राष्ट्रपतींकडे करणार आहेत.
शिष्टमंडळात भाजपतर्फे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली, लोकसभेचे उपनेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, माजी खासदार किरीट सोमय्या, तर शिवसेनेतर्फे खासदार संजय राऊत, अनंत गीते, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचा समावेश असणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.