आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2028 पर्यंत भारत जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनणार, मात्र रिफॉर्मची गरज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपान आणि जर्मनीला मागे टाकत भारत पुढील 10 वर्षात जगातील सर्वात तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. - Divya Marathi
जपान आणि जर्मनीला मागे टाकत भारत पुढील 10 वर्षात जगातील सर्वात तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे.
मुंबई- जपान आणि जर्मनीला मागे टाकत भारत पुढील 10 वर्षात जगातील सर्वात तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. हा अंदाज व्यक्त केला आहे ब्रिटनच्या ब्रोकरेज फर्म एचएसबीसीने. त्यांचे म्हणणे आहे की, यासाठी भारताला सातत्याने रिफॉर्मवर काम करावे लागेल आणि सामाजिक क्षेत्रावर लक्ष द्यावे लागेल. एचएसबीसीच्या रिपोर्टनुसार, भारतला ईज ऑफ डूइंग बिजनेस आणि कॉन्ट्रेक्ट इन्फोर्समेंटवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यासोबतच भारताला आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी लागेल. जी आता गरजेपेक्षा खूपच कमी आहे. रिपोर्टनुसार, भारत पुढील 10 वर्षात जपान आणि जर्मनीच्या नॉमिनल यूएसडीच्या तुलनेत पुढे गेलेला असेल. रिपोर्टनुसार, भारताच्या लोकसंख्येत तरूणांची संख्या जास्त असल्याने आणि मॅक्रो स्टेबिलिटी (बाहेरील क्षेत्रातून धोका होण्याची कमी शक्यता) महत्वपूर्ण घटक असल्याचे म्हटले आहे. या वर्षी भारताची जीडीपी 7.1 टक्के राहील...
 
- रिपोर्टनुसार, जीएसटीमुळे भारताची इकोनॉमी या वर्षी 7.1 टक्के अशी राहील. नंतर यात वाढ होईल.
- यात म्हटले आहे की, भारत वेगाने सुधारणेच्या मार्गावर आहे. मात्र, भारताने यात धरसोड केली तर नुकसानदायी ठरू शकते.
 
# ई-कॉमर्स सेक्टरमध्ये 1 कोटींहून अधिक नोक-या-
 
- रिपोर्टनुसार, रोजगार व नोकरी निर्मितीची चिंता भारताला भेडसावत असताना ई- कॉमर्स कंपन्या 1.2 कोटी नोकरी देतील. जी 2.4 कोटींच्या मागणीच्या निम्मी असेल. 
- याशिवाय सर्वात जास्त नोकरी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात येतील. 
 
# चीनपेक्षा वेगळा आहे भारत-
 
- रिपोर्टनुसार, भारताची स्थिती चीनपेक्षा वेगळा आहे. चीनची अर्थव्यवस्था निर्यात आधारित आहे. 
- त्यानुसार, भारताला 55 कोटी ग्राहकांचा बाजार आहे, जो खूपच महत्वपूर्ण मानले जाते. 
 
# सेवा क्षेत्रात राहील जोर-
 
रिपोर्टनुसार, भारताची सेवा आधारित अर्थव्यवस्था बनत जाईल. मात्र, भारताला आता उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करावे लागेल. सोबतच भारताला कृषी क्षेत्रावर लक्ष द्यावे लागेल. 
 
# 2028 मध्ये 7 ट्रिलियनची अर्थव्यवस्था असेल भारत-
 
रिपोर्टनुसार, भारत 2028 पर्यंत 7 ट्रिलियन (7 लाख कोटी डॉलर)ची इकोनॉमी असेल. त्यावेळी जर्मनी 6 ट्रिलियन डॉलर तर जपान 5 ट्रिलियन डॉलरची इकोनॉमी असेल. सध्या भारताची 2.3 ट्रिलियन डॉलर एवढी अर्थव्यवस्था आहे. भारत सध्या जगातील सर्वात 5 वी मोठी अर्थव्यवस्था आहे. अमेरिका, चीन, जर्मनी, जपाननंतर भारताचा पाचवा क्रमांक लागतो.
बातम्या आणखी आहेत...