आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Air Force Chopper Makes Emergency Landing At BKC Ground Mumbai

मुंबई: बीकेसीत एयरफोर्सच्या हेलिकॉप्टरचे इमरजन्सी लॅंडिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील बांद्रा- कुर्ला कॉम्पलेक्स म्हणजेच बीकेसीतील मैदानात बुधवारी दुपारी इंडियन एयरफोर्सचे एक एमआय-17 हेलिकॉप्टरचे इमरजन्सी लॅंडिंग करण्यात आले. याबाबत सांगितले जात आहे की, या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे सहा अधिकारी होते. हे सर्व सुरक्षित आहेत. हे हेलिकॉप्टर एयरबेसकडे जात होते. मात्र, पायलटने हेलिकॉप्टरला एका मोकळ्या मैदानात अचानकपणे उतरविण्याचा निर्णय घेतला. या परिसरात सुरक्षेसाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. याबाबत सांगितले जात आहे की, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच पायलटने इमरजन्सी लॅंडिंग केले.
काय आहे बीकेसी?
मुंबईतील बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स भागात अनेक बड्या कंपनीची कार्यालये आहेत. हा भाग उच्चाभ्रू व दाट लोकसंख्येचा आहे. येथून एयरपोर्ट सुमारे सात किलोमीटर दूर आहे. एयरफोर्सचे इंजीनियर एमएमआरडीएच्या मैदानावर चॉपरच्या चौकशीसाठी गेले आहेत. जेथे इमरजन्सी लॅंडिंग केले आहे. दरम्यान, एयरफोर्सकडून याबाबत अद्याप कोणतेही प्रतिक्रिया आलेली नाही. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ज्या वेळी हेलिकॉप्टर लॅंडिंग करण्यात आले त्यावेळी तेथे मुले खेळत होती.
पुढे पाहा, इमरजन्सी लॅंडिंग करतानाची छायाचित्रे...