आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्राच्या तळाशी KISS घेऊन मुंबईच्या जोडप्याने केले अनोख्या पद्धतीने लग्न!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गोताखोरी (स्कुबा डायविंग)च्या छंदी असलेल्या मुंबईतील एका कपलने सोमवारी समुद्राच्या तळाशी जाऊन लग्न करून सगळ्यांना कोड्यात टाकले आहे. थायलंडमधील दक्षिण आयलॅंड ट्रॅंग समुद्रातील पाण्याच्या खाली हा समारोह झाला. असे अनोख्या पद्धतीने लग्न करणा-या मुंबईच्या कपलचे नाव आहे शैलेश कोचरेकर आणि पूजा राऊत. शैलेय व पूजाने एकमेंकाना किस करीत पुन्हा एकदा लग्नांच्या आणाभाका घेतल्या. समुद्राच्या तळाशी लग्न करणारे पहिले भारतीय कपल म्हणून या दोघांची नोंद झाली आहे. या दोघांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.
शैलेश व्यावसायाने एक गोताखोर (पाण्याखालील सफरीचा चालक). त्याचा पूजाशी डिसेंबर 2014 मध्ये हिंदू रिती-रिवाजाने विवाह झाला होता. मात्र या दोघांचे मित्र त्यांना खोताखोर जोडपे असे संबोधित असत. या दोघांचे लग्न झाले तेव्हा शैलेशचे सर्व मित्र त्याला तुझे एका मत्स्यकन्येशी विवाह झाल्याचे म्हणत होते. यानंतर शैलेश व पूजाच्या मनात हीच बाब घर करून बसली. त्यानंतर या दोघांनी आपले नात्याला आणखी खास करण्यासाठी समुद्राच्या तळाशी जाऊन पुन्हा एकदा विवाह करण्याचा निर्णय घेतला.
याआधी बौद्ध रितीने घेतली होती प्रतिज्ञा-
शैलेश आणि पूजा यांनी समुद्राच्या तळाशी जाऊन लग्न करण्यापूर्वी डिसेंबर 2014 मध्ये बौद्ध धर्माच्या चालीरितीनुसार विवाह केला होता. तसेच या दोघांच्या विवाहाचा सेरेमनी कार्यक्रम बीचवर झाला. जेथे दोघांनी खास पेनने लग्नाच्या सर्टिफिकेटवर स्वाक्षरी केल्या.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, पूजा आणि शैलेशच्या लग्नांचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...