पणजी- संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज पणजीत सांगितले की, भारतीय रेल्वे लवकरच अरुणाचल प्रदेशात भारत-चीन सीमेवर स्टेशन उभारेल. पर्रीकरांनी सांगितले की, या संबंधी एमआययू (मेमोरंडम ऑफ अंडरस्टैन्डिंग)चा ड्राफ्ट तयार करण्यात आला आहे तसेच यावर लवकरच त्यावर स्वाक्षरी होतील. या प्रोजेक्टबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचेही पर्रीकर यांनी सांगितले. भारत आणि चीन यांच्यात सीमेवरील तणाव मागील काही दिवसापासून कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्याला माहित असेलच की संरक्षण मंत्री पर्रीकर यांचे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा चीन माऊंट एवरेस्टमध्ये एका टनेलद्वारे नेपालपर्यंत रेल लिंक बनविण्याच्या योजनेवर काम करीत आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र चायना डेलीने याबाबत वृत्त दिले आहे. हे वृत्त भारतात धडकताच भारतीय तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. काही दिवसापूर्वी चीनने म्हटले आहे की, अरुणाचल प्रदेशामुळेच दोन्ही देशांत वाद आहे व त्याचा इन्कार करता येणार नाही. असे असले तरी चीनने पीएम
नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान सीमा वाद सहमतीने व सकारात्मक दृष्टीनेच सोडवला जाईल असे आश्वासन दिले आहे.