आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय बाहुल्या इंडोनेशियात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जकार्ता येथे साज-या होणा-या ‘वायांग वर्ल्ड पपेट्री’ महोत्सवात जगातील उत्कृष्ट आणि निवडक बाहुलीकार सादरीकरण करणार आहेत. या महोत्सवात सहभागी झालेल्या 384 बाहुलीकार स्पर्धकांमधून शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांची या महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे.


‘बोलक्या बाहुल्या’ आणि रामदास पाध्ये यांची बोटे हे समीकरण असे ठरुन गेले आहे की आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येही भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केवळ हे नाव पुढे येते. विविध भाषांमध्ये बाहुल्यांना बोलते करण्यासाठी पाध्ये आणि कुटुंबीयांनी विदेशांतून आमंत्रणे येऊ लागली. आताची इंडोनेशियात ‘पपेट्री’ सादर करण्यासाठी त्यांची झालेली निवड भारताची मान उंचावणारी आहे. या कार्यक्रमासाठी पाध्ये यांनी ‘ग्लोबल वॉर्मिंग’वर आधारित एक खास कार्यक्रम बसवला आहे. पारंपरिक कळसूत्री बाहुल्या आणि आधुनिक बाहुल्यांच्या सादरीकरणातून एक नवा थक्क करणारा अनुभव प्रेक्षकांना देणार असल्याचे ते म्हणाले.