आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार उच्चांकी पातळीवर, सेंसेक्स 22 हजारांच्या ऐतिहासिक टप्प्यावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशाचे राजकारण जसे जसे तापू लागले तसे तसे शेअर बाजारातही तेजी येऊ लागली आहे. आशिया खंडातील बहुतेक बाजार कमकुवत होत असताना भारतीय शेअर बाजार मात्र उसळी घेत आहे. सोमवारी शेअर बाजार सकाळच्या सत्रात 22 हजारांच्या ऐतिहासिक टप्प्यावर गेला. बीएसईच्या प्रमुख 30 कंपन्यांचे शेअर 37.10 अंशांनी म्हणजे 0.17 टक्क्यांनी वाढले. दुसरीकडे, निफ्टी 0.45 अंश म्हणजे 0.01 टक्के वाढून तो 6526 वर गेला आहे.
निवडणुकीच्या अगोदरच तेजी- निवडणुकीच्या आधीच तापलेले वातावरण व भाजपला मिळत असलेला प्रतिसाद यामुळे सेंसेक्सने नवी पातळी गाठल्याचे जाणकार सांगत आहे. भांडवलशाहीला पूरक असे जर मोदींचे एनडीए सरकार देशात आले तर व्यवसायाला चालना मिळेल, असे अंदाज बाजारात व्यक्त होत आहेत. यापूर्वीही निवडणुकीच्या अगोदर शेअर बाजार उसळी मारत असल्याचे दिसून आले आहे. मात्र यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत सामान्यात मोठी उत्सुकता आहे. त्यामुळेच शेअर बाजारात तेजीचे व उत्सावाचे वातावरण आहे.
काय प्रमुख कारणे आहेत तेजीची...
- एफआयआयसोबत छोट्या-छोट्या गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक
- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर मार्केट फ्रेंडली सरकार येण्याची आशा
- देशाची सुधारत असलेली आर्थिक स्थिती, त्यामुळे गुंतवणूकदार वळत असल्याचे चित्र
- आशिया खंडातील देशाची आर्थिक स्थिती सुधारत असल्याचे चित्र
- कॅपिटल गुड्स, बांधकाम आणि बॅंकांचे शेअर तेजीत...