आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Mujahideen Chief Yasin Bhatkal Target Ganesh Festival

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

EXCLUSIVE: यासिन भटकळ गणेशोत्सवाला करणार होता टार्गेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- इंडियन मुजाहिदीनचा मास्‍टरमाईंड आणि संस्‍थापक यासिन भटकळ पुण्यामुंबईसह महाराष्ट्रातील आगामी गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर घातपात घडविणार होता. त्याला पाकिस्तानमधून असे आदेश मिळाले होते, अशी खळबळजनक माहिती मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकातील सूत्रांकडून मिळालेली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यासिनला भारत-नेपाळ सीमेवर अटक करण्यात आली तेव्हा त्याने नेपाळमधील एका प्रकल्पावर काम करीत असल्याचे सांगितले. संगणक अभियंता म्हणून तेथे काम करतो, अशी माहिती दिली. परंतु, पोलिसांचे समाधान न झाल्याने मी युनानी डॉक्टर असल्याचे त्याने सांगितले. अखेर त्याला अटक करण्यात आली. इंडियन मुजाहिदीनचा सदस्य असादुल्लाह अख्तर यालाही यासिनसोबत अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यामुंबईसह महाराष्ट्रातील गणोशोत्सवाला टार्गेट करण्याचे आदेश यासिनला पाकिस्तानकडून मिळाले होते. यापूर्वी त्याने पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराची रेकी केली होती, हे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

यासिन भटकळने ठेवले होते, मुंबईतील ऑपेरा हाऊस, झवेरी बाजार येथे बॉम्ब वाचा पुढील स्लाईडवर...

आणखी वाचा....

दहशतवादी टुंडाला खायचीये जामा मशिद परिसरातील मोगलाई बिर्याणी
न्यायालयाच्या आवारात देशद्रोही अब्दुल करीम टुंडाला चोपले
‘आयएसआय’शी होता अतिरेकी टुंडाचा संपर्क, 1995 मध्ये झाली होती हमीद गुल यांची भेट
मशिदी म्हणजे दहशतवादी केंद्रे, प्रत्येक इमामावर न्यूयॉर्क पोलिसांची हेरगिरी
पुण्यात साखळी ब्लास्ट होत असताना इंटरनेट चॅटिंग करत होते दहशतवादी!