आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई इंडियन्सकडून खेळलाय हा क्रिकेटर, आता केला हा उद्योग, निघाले अरेस्ट वारंट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा युवा क्रिकेटर दीपक पुनिया इंडियन नेवीत ऑफिसर आहे. - Divya Marathi
हा युवा क्रिकेटर दीपक पुनिया इंडियन नेवीत ऑफिसर आहे.

मुंबई- क्रिकेटर दीपक पुनियाविरोधात इंडियन नेवीने अरेस्ट वारंट जारी केले आहे. दीपक इंडियन नेवीत ऑफिसर आहे आणि सध्या तो INS अंगरे वर तैनात आहे. त्याच्यावर नेवीला न सांगता किंवा ऑब्जेक्शन सर्टिफिकेट न घेता हरियाणा रणजी टीमकडून दोन मॅच खेळल्याच आरोप आहे. नेवीने जारी केले वारंट....

 

- 24 ऑक्टोबरला जारी केलेल्या या वारंटमध्ये INS अंगरेचे कमांडिंग ऑफिसर कमांडर एमएमएस शेरगिल यांनी हरियाणा आणि मुंबई पोलिसांना पुनियाला अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
- कमांडर एमएमएस शेरगिल यांनी मुंबई स्थित नवल प्रोवोस्ट मार्शल, कमांडर ब्यूरो ऑफ सेलर्स यांना ही पुनियाला अटक करण्याबाबत आदेश दिले आहेत.
- वारंटमध्ये म्हटले आहे की, "दीपक पुनियाचे हे कृत्य नेवी अॅक्ट 1957 नुसार गुन्हा आहे आणि दीपक पुनिया AG PO (US), 237169-Y ला इंडियन नेवीच्या कोणत्याही शिपवर चौकशीसाठी आणि पुढील कारवाईसाठी आणले जाऊ शकते."

 

मुंबई इंडियन्कडून खेळलाय दीपक-

 

- 24 वर्षाचा दीपक पुनियाने 2014 मध्ये नेवीत नोकरी सुरू केली. दोन सीजनमध्ये तो सौराष्ट्राकडून तर यंदा हरियाणाकडून खेळत आहे.
- वारंट जारी होण्याआधी हरियाणाकडून खेळताना दीपकने तीन विकेट घेतल्या होत्या. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे.
- दीपकने आपली पहिली मॅच हिमाचल प्रदेशविरूद्ध 2014 मध्ये खेळली आहे. 

 

काय म्हणणे आहे दीपकचे-

 

- एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना दीपक म्हणाला की, हरियाणाकडून खेळण्यापूर्वी मी माझ्या सीनियर ऑफिसरशी बोललो होतो. त्यांनी मला रीतसर सुट्टी दिली होती.
- पुढे तो म्हणाला की, "मी ड्यूटीदरम्यान खेळू शकत नाही. मला दुस-या राज्याकडून खेळायचे असेल मला सुट्टी घ्यावी लागेल. त्यासाठी मी 30 दिवसाच्या रजेचा अर्ज दिला आहे. नंतर मला सुट्टी वाढवून हवी होती. मात्र, माझ्या ऑफिसरने त्यास नकार दिला. यानंतर मला परत आला तरी आणि नाही आला तरी माझ्याविरोधात अरेस्ट वारंट जारी करणार असल्याचे सांगितले."
- दीपक म्हणतो, "मला माहित नाही हे काय सुरू आहे. यापूर्वी मी खेळताना कधीही प्रॉब्लेम आला नव्हता. मी यापूर्वी दोन सीजन सौराष्ट्राकडून तर मुंबई इंडियन्सकडून खेळलो आहे. आता ते अचानकपणे म्हणत आहेत की, मी हरियाणाकडून खेळू शकत नाही."

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, दीपकचे काही फोटोज........

बातम्या आणखी आहेत...