मुंबई - मुंबईच्या ‘ट्रायाॅलॉजी’ पंचतारांकित हॉटेलमध्ये चक्क भारतीयांच्याच प्रवेशावर बंदी आहे. एक जोडपे तिथे गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. हॉटेलविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
शनिवारी सोनू हा तरुण वाढदिवस साजरा करण्यास मैत्रिणीसह हॉटेलात गेला. मात्र, महिला कर्मचाऱ्याने त्याला प्रवेशापासून राेखत शिवीगाळ केली. त्यानंतर सोनूने पोलिसांना फोन करून माहिती दिली. आरोपी महिलेचे नाव आयपीएल खेळाडू व टीव्ही अभिनेत्यांचा सहभाग असलेल्या ड्रॅग्ज रॅकेटमध्ये आलेले आहे. याच हॉटेलात आदित्य पांचोलीने हिंदी गाणे न वाजवल्यामुळे गोंधळ घातला होता.