आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Readership Survey : Daily Bhaskar Largest Newspaper Group In The Country

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडियन रीडरशिप सर्व्हे : दैनिक भास्कर देशात सर्वात मोठा वृत्तपत्र समूह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘इंडियन रीडरशिप सर्व्हे 2012’ च्या चौथ्या तिमाहीची आकडेवारी गुरुवारी मुंबईत जाहीर करण्यात आली. यानुसार दैनिक भास्कर समूहाची वाचकसंख्या 5 लाखाने वाढून 1.97 कोटींवर पोहचली असून देशातील सर्वांत मोठ्या वृत्तपत्र समूहाचा मान भास्कर समूहाने कायम राखला आहे. समूहाच्या 13 राज्यांत चार भाषांमध्ये एकूण 65 आवृत्त्या आहेत.
पहिल्या चार वृत्तपत्र समूहांत दैनिक भास्करने आयआरएस 2012 च्या तिस-या तिमाहीच्या तुलनेत एसईसीएबी विभागात दोन लाख नवे वाचक जोडले.

‘दिव्य मराठी’ने महाराष्‍ट्रात एक लाख नवे वाचक जोडले असून 11 टक्के वाढ नोंदवली आहे. महाराष्‍ट्रातील मराठी दैनिकांच्या तुलनेत ही सर्वाधिक वाढ आहे. दिव्य मराठीने 71 टक्के वाचक शहरी भागांत आहेत. सन्माननीय वाचकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित बातम्या, विश्लेषणे आणि लेख प्रसिद्ध केल्याचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे आम्हाला वाटते.

दैनिक भास्करने मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्येही वर्चस्व कायम राखले आहे. 45.97 लाख वाचकांसह मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या सहा प्रमुख शहरांमध्ये हा समूह अव्वल स्थानावर आहे. भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर, जबलपूर, रायपूर आणि दुर्ग भिलाईमध्येही समूहाचे प्रभुत्व कायम आहे.

दैनिक भास्करने 10.33 लाख वाचकांसह जयपूरमध्येही वर्चस्व कायम राखले असून इतर वृत्तपत्रांच्या तुलनेत ते 30 टक्क्यांनी अधिक आहे. राजस्थानातही सर्वाधिक शहरी वाचकसंख्या असलेला वृत्तपत्र समूह म्हणून स्थान टिकवून आहे. अहमदाबादेत वाचकांची पहिली पसंती ‘दिव्य भास्कर’ला आहे. या वृत्तपत्राची वाचकसंख्या 29 टक्के अधिक आहे. एका शहरात दहा लाखांवर वाचक असलेले हे एकमेव गुजराती वृत्तपत्र आहे.