मुंबई - एकटे राहणारे लोक जे महागडे वॉशिंग मशीन खरेदी करू शकत नाहीत, अशांसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबईतील स्टार्टअप कंपनीने विमबास नवराचन वॉशिंग मशीन बनवली असून ती अवघ्या १५०० रुपयांना मिळू शकेल.
स्टार्ट अपचे संस्थापक पीयूष अग्रवाल यांनी सांगितले की, ही मशीन मार्च २०१५ पासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. ही मशीन कोणत्याही प्रकारच बकेटात फिट करता येऊ शकते. यात दर पाच मिनिटांत २.५ किलो वजनाचे किंवा साधारणत: सात कपडे धुता येऊ शकतात.
या प्रकल्पासाठी कंपनीने बाजारातून जवळपास ३० लाख रुपये जमवले आहेत. अग्रवाल यांचे म्हणणे असे की आम्ही प्रथम १००० रुपयांत वॉशिंग मशीन देण्याचा विचार केला होता. परंतु शेवटी यावर १५०० रुपयांत मशीन तयार झाली. वीज नसेल अशा भागात डीसी (डायरेक्ट करंट) वर १२ व्होल्टची बॅटरी लावून ही मशीन चालवता येईल. कंपनीने याचे दोन मॉडेल तयार केले आहेत. मशीनच्या देशातील वितरणाबाबत डिसेंबरमध्ये माहिती देण्यात येणार आहे.