आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कान लायन’मध्ये माइंड शेअरला ग्रांप्री अवाॅर्ड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कान लायन इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ क्रिएटिव्हिटी-२०१६ मध्ये माइंड शेअर या भारतातील प्रतिष्ठित माध्यम संस्थेला ग्रांप्री अवाॅर्ड मिळाला आहे. ग्लास लॉयन कॅटेगरीत ६-पॅक बँड मोहिमेसाठी संस्थेला हा पुरस्कार देण्यात आला. कानमध्ये ग्लास लॉयन्स गेल्या वर्षी Lean In.org सोबत मिळून सुरू केला होता. त्यात सकारात्मक काम करणे, लैंगिक समानता आणि अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्यांना नामांकन मिळाले होते.

६-पॅक बँड मोहीम हिंदुस्तान युनिलिव्हरने सुरू केली होती. वाय फिल्म, द यूथ विन्स ऑफ वायआरएफ स्टुडिओज त्याचे सहप्रायोजक होते. या मोहिमेअंतर्गत भारताचा पहिला ट्रान्सजेंडर बँड सुरू झाला. त्याला ब्रुक बाँड रेड लेबल -६ नाव देण्यात आले. गेल्या काही महिन्यांत या बँडने अनेक सकारात्मक आणि बंधुभाव वाढवणारी गाणी प्रकाशित केली आहेत. बँडमध्ये ६ ट्रान्सजेंडर गायकही सहभागी आहेत. माइंड शेअरचे प्रमुख अमीन लाखानी म्हणाले की, ‘हा पुरस्कार मिळाल्याने आम्ही आनंदी आहोत. फुलक्रम आणि ब्रुक बाँड टीमचे मनोबल खूप वाढले’.
बातम्या आणखी आहेत...