आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिवाळी सुटीसाठी भारतीयांची पसंती गोवा, दुबई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/औरंगाबाद - दिवाळीच्या सुट्या कुटुंबीयांसाेबत मजेत घालवण्याचे बेत एव्हाना सर्वांनी आखले आहेत. यंदा दिवाळीची सुटी साजरी करण्यासाठी भारतीयांनी विदेशी पर्यटनस्थळांत दुबईला, तर देशातील स्थळांबाबत गोव्याला सर्वाधिक पसंती दिली आहे. हॉटेल्स डॉट कॉमने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
हॉटेल्स डॉट कॉमने एक जानेवारी ते ३० सप्टेंबर या काळात झालेल्या वास्तविक आगाऊ बुकिंगवरून हे निष्कर्ष काढले आहेत. भारतीयांनी ३० ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर या काळात पर्यटनासाठी निवडलेल्या स्थानांचा यात विचार करण्यात आला. देशाबाहेरील स्थळांच्या बाबतीत बा अटोल (मालदीव), ऑस्ट्रियातील व्हिएन्ना, स्पेनमधील बार्सिलोना तर देशातील गुरुग्राम , कोलकाता यांनाही चांगली पसंती मिळाल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे गेल्या वर्षीही दुबई आणि गोवा ही दोन ठिकाणेच भारतीयांची पसंती ठरली होती. यंदाही त्यात बदल झालेला नाही. देशातील पसंती यादीत यंदा गुरुग्रामचा समावेश झाला आहे. दुबईतील पाम बीच तर गोव्यातील कलंगुट, बागा आदी सागरकिनाऱ्यांचे आकर्षण कायम असल्याचे यंदाच्या सर्वेक्षणावरून दिसून आले.
बातम्या आणखी आहेत...