आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखांत : धर्मानुसार अंत्यसंस्कार विधीसाठी स्थापन झाली देशातील पहिली कंपनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जिवंत असताना माणूस स्वत:ची हर तऱ्हेने काळजी घेतो. पण... मरणानंतर आपल्यावर काळजीपूर्वक अंत्यसंस्कार होतील याची त्याला खात्री नसते. ऱ्हास होत चाललेली एकत्रित कुटंुब पद्धती, अंत्यसंस्काराच्या वेळी दोन हात दूरच राहणारी नवीन पिढी, समाजाशी तुटत चाललेली नाळ या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्काराच्या सर्व जबाबदारीला खांदा देण्यासाठी सुखांत फ्युनरल मॅनेजमेंट कंपनी आकाराला आली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची ती भारतातील पहिलीच कंपनी ठरली आहे.
‘सुखांत’चे प्रतिनिधी धर्मानुसार अंत्यसंस्काराची सर्व माहिती घरी येऊनही माहिती देऊ शकतात, असे संचालक संजय रामगुडे यांनी सांगितले.
अशी आहे ‘मोक्ष’प्राप्ती
मोक्ष प्लॅनमध्ये व्यक्तीच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार होतील. एखाद्याने मृत्यूपूर्वी देह, नेत्र किंवा अवयव दानाची इच्छा व्यक्त केली असेल तर ती कार्यवाही केली जाईल. िवशेष म्हणजे मोक्षधाममध्ये श्रद्धांजली सभेत मृत व्यक्ती आधी केलेल्या िव्हडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून उपस्थितांशी संवादसाधेल. तुम्ही अंत्यसंस्काराला आलात त्याबद्दल ती तुमचे आभार मानेलच, पण माझ्यानंतर कुटुंबीयांवर लक्ष ठेवा, अशी िवनंतीही करेल.
तत्काळ प्लॅनही : "मोक्ष'बरोबरच तत्काळ प्लॅनही आहे. "सुखांत'ने ९ मार्चपासून कामाला सुरुवात केली. सध्या कंपनीचे क्षेत्र मुंबईपुरते मर्यादित असले तरी उर्वरित महाराष्ट्र िकंवा देशभरात सेवा देण्याचा त्यांचा आहे.
उणीव भरण्याचा प्रयत्न
काळ बदलला तशी समाजाची धाटणीही बदलत गेली. एकत्रित कुटुंब पद्धतीला तडे गेल्याने कौटुंबिक जिव्हाळाही आटत गेला. संस्कारांचे हस्तांतरण न झाल्याने नवी पिढी अंत्यसंस्कार विधीच्या प्रक्रियेपासून अनभिज्ञच राहिली. अशा प्रसंगी तिला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. ही उणीव लक्षात घेऊनच "सुखांत'ने मोक्ष प्लॅन तयार केला आहे.
जपान : शुकात्सू सोहळा!
मृत्यू हा शब्द अनेकांना घाम फोडणारा असला तरी जीवनाचे एकमेव सत्य मानून मृत्यू एन्जॉय करणारे लोकही जगात आहेत. जपानची राजधानी टोकियोत दरवर्षी मृत्यूचा सोहळा भरतो. त्याचे नाव आहे शुकात्सू. म्हणजे मृत्यूसाठी सज्जतेचा सण. आपण मेल्यानंतर कसे दिसावे, कुठल्या दफनपेटीत आपणाला ठेवले जावे, तिची सजावट कशी करावी हे माणसे अगोदरच ठरवतात आणि अॅडव्हान्समध्ये त्यासाठी आवश्यक सामानाची खरेदीही करतात. या उत्सवाला दरवर्षी साधारण ५ हजार लोक येतात आणि आपली दफनपेटी निवडतात. त्यात झोपून पाहतात. कलाकुसर पाहतात आणि आवडली तर पेटी बुक करून टाकतात.
येथे साधा संपर्क
मोक्ष प्लॅनसाठी sukhantfuneral@gmail.com या ई-मेलवर िकंवा www.sukhantfuneral.com येथे संपर्क साधावा.