आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India's First Domino Kidney Replantation Succeeded In Mumbai

भारतातील पहिले डॉमिनो किडनी प्रत्यारोपण मुंबईत यशस्वी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईतील तीन रुग्णालयांत भारतातील पहिलेवहिले डॉमिनो किडनी प्रत्यारोपण मंगळवारी यशस्वीरीत्या पार पडले. यात नातेसंबंध नसलेले पाच दाते आणि पाच रुग्णांचा समावेश होता. बॉम्बे आणि हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी दोन तर हिंदुजामध्ये एक शस्त्रक्रिया झाली.


साधारणपणे नातेसंबंध असलेल्या व्यक्तींतच किडनी प्रत्यारोपण होते. मात्र डॉमिनो प्रत्यारोपणात पाच दात्यांनी नाते नसलेल्या रुग्णांना किडनी दान केली. दाता-रुग्ण यांच्यात नाते नसल्याने कायदेशीर अडचण उद्भवली होती. पाचपैकी चार दाते महाराष्‍ट्रातीलच असल्यामुळे मुंबईत शस्त्रक्रिया झाल्या. त्यांना गेल्या आठवड्यात अधिकृतरीत्या मंजुरी मिळाली होती.दिव्य मराठी नेटवर्कने सर्वात आधी या प्रत्यारोपणाचे वृत्त प्रकाशित केले होते.


काय आहे डॉमिनो प्रत्यारोपण: कोणत्याही अवयवाच्या प्रत्यारोपणासाठी रक्तगट व रक्तपेशी जुळणे गरजेचे असते. मात्र तसे होत नसेल तर रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉमिनो हाच पर्याय उरतो. या क्रमबद्ध शस्त्रक्रिया आहेत. यात एका जोडीतील दाता दुस-या जोडीतील रुग्णाला आपली किडनी देतो. सर्वात आधी शेवटचा दाता पहिल्या रुग्णाला आपली किडनी देतो. यापूर्वी प्रत्यारोपणाच्या मंजुरीला विलंब झाल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.