आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मुंबईत साकारलाय देशातील पहिला डबलडेकर फ्लायओवर, वाचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र आपल्या विकासाचे पुढील टप्पे गाठताना दिसतो. अर्थव्यवस्था असो की पायाभूत सुविधांच्या बाबतीत असो महाराष्ट्राने देशाच्या उर्वरित राज्याअगोदर मोठी मजल नेहमीच मारत आला आहे. नवे व्यवसाय, पार्क, पायाभूत विकासाचे प्रोजेक्ट्सपासून औद्योगिक विकासातही मोठी झेप घेतली आहे. बांधकाम क्षेत्रातही मुंबई-पुणे-नाशिकसारख्या शहरात मोठी तेजी आहे. त्यामुळे या शहरात पायाभूत सुविधा दर्जेदार असल्याचे पाहायला मिळते. आज आम्ही तुम्हाला मुंबईतील डबलडेकर फ्लायओवरबद्दल सांगणार आहोत जो देशातील पहिलाच असा उड्डाणपूल आहे.
मुंबईत बनला पहिला डबल डेकर फ्लायओवर

भारतातील पहिला डबलडेकर फ्लायओवर काही महिन्यांपूर्वी मुंबईत सुरु झाला. सांताक्रूज-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) प्रोजेक्ट नावाने ओळखला जाणारा हा फ्लायओवर मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडतो. फ्लायओवर लांबी 3.5 किमी आहे तर, अपरलेवल फ्लायओवर 1.8 किमी लांब आहे.

90 मिनिटांचे अंतर आले 20 मिनिटांवर
ट्रॅफिकमुळे मुंबईतील सांताक्रूजहून चेंबूरला जाण्यासाठी खरंतर 90 मिनिट आधी लागायचे मात्र, फ्लायओवर झाल्यानंतर हे अंतर आता 20 मिनिटात कापले जात आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायपासून कुर्ला, तिळक नगर, चेंबूर आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेपर्यंत फ्लायओवरमुळे पोहचणे सहजसोपे झाले आहे.
फ्लायओवर बांधायला लागले करोडो रूपये
सुरुवातीला या प्रोजेक्टला 100 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, हा फ्लायओवर पूर्ण होण्यास 11 वर्षे लागली व त्याचा खर्च चारपट वाढून 450 कोटी रूपयांवर गेला. 2002 मध्ये फ्लायओवर बनविण्याचा सरकारने विचार केला तर, त्याचे काम 2006 पासून सुरु झाले होते. 2014 ला या फ्लायओवरचे काम पूर्ण होऊन लोकांसाठी उपलब्ध करून दिला गेला.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, देशातील पहिल्या डबल डेकर फ्लायओवरचे PHOTOS....