आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India's First Double decker Flyover Opens In Mumbai

देशातील पहिला डबलडेकर फ्लायओव्हर मुंबईत सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील पहिला दोनमजली (डबलडेकर) फ्लायओव्हर शुक्रवारी मुंबईत सुरू झाला. या फ्लायओव्हरच्या बांधकामासाठी सुमारे 450 कोटी रुपये खर्च झाले आहेत. मुंबई पश्चिम व पूर्व उपनगरांना जोडणार्‍या या फ्लायओव्हरमुळे मुंबईकरांचा दीड तासाचा प्रवास आता अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण होणार आहे. साडेतीन किलोमीटर लांबीच्या या फ्लायओव्हरचा 1.8 किलोमीटरचा भाग दोनमजली आहे.

मुंबईच्या वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेला जोडणार्‍या सांताक्रुझ - चेंबूर लिंक रोडची (एससीएलआर) योजना 2002 रोजी तयार करण्यात आली होती. याचे प्रत्यक्ष बांधकाम 2006 मध्ये सुरू झाले व तो 2014 मध्ये पूर्ण झाला आहे. सध्या लोकसभा निवडणूक व त्याची आचारसंहिता सुरू असल्याने मोठय़ा समारंभाविनाच या पुलाचे लोकार्पण झाले. यामुळे पश्चिम व पूर्व उपनगरादरम्याचे प्रवासाचे अंतर कमी झाले. शिवाय कलानगर जंक्शन, चेंबूर, कुर्ला, धारावी, बांद्रा, सांताक्रुझ आदी मार्गांवरील ट्रॅफिक जाममधून प्रवाशांची सुटका झाली आहे.