आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पहिले सुगंधी उद्यान!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वाघांसाठीप्रसिद्ध असलेल्या बाेरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात देशातील पहिली सुगंधी फुलांची बाग बहरली अाहे. त्यामुळे प्रसिद्ध उद्यानतज्ञ्ज सुहास जोशी यांच्या या संकल्पनेमुळे काँक्रीटच्या जंगलात श्वास कोंडलेल्या मुंबईकरांना एक सुगंधी दरवळ लाभत आहे. या उद्यानातील एकर जागेवर ६० प्रकारची १५ हजार सुगंधी रोपटी झाडे लावण्यात आली असून त्यांचा सुगंध आता सर्वत्र पसरू लागलाय... देशातील हा पहिलाच प्रयाेग मानला जाताे.
उद्यानातील एकरच्या जागेवर पूर्वी गुलाबाची झाडे होती. त्यानंतर बरीच वर्षे ती तशीच पडून होती... मात्र आता १५ हजार झाडे, रोपटी सर्वत्र लावण्यात अाली आहेत. या चार एकर जागेमागे जंगल डोंगर असल्याने त्याला धबधब्याची पार्श्वभूमी देऊन ही बाग अधिक खुलवण्याचा प्रयोग केला आहे. या िशवाय वेगवेगळ्या रंगांची कमळे पाण्यात फुलल्याने पाण्यातही रंगांचे नक्षीकाम झाल्याचे प्रतिबिंबही िदसते!
संगीतातील रागांप्रमाणे फुलांच्या सुगंधाचीही एक वेळ असते... पहाटे दवाच्या स्पर्शाने वेगवेगळे चाफे, मोगरा, अनंत बहरू लागताे. चाफा, मोगरा, अनंत बहरण्याचा उन्हाळ्याचा सध्याचा मोसम असून पावसाळ्यात जाई-जुईचे मंडप फुलू लागतात. प्राजक्त, रातराणीचा संध्याकाळी सुगंध पसरताे. औषधी वनस्पतींचाही सुगंध असतो. त्यात चार प्रकारच्या तुळशींनी या बागेत बहर अाणला अाहे, अशी माहिती जाेशी देतात.

सुगंधी रोपटी झाडे...
सोनचाफा,िहरवा चाफा, कवटी चाफा, मोगरा, बटमोगरा, जुई, बकुळ, सुरंगी, पारिजातक, केवडा, रातराणी, अनंत, िनशिगंध, गुलछडी, मारवा, ब्राह्मी, वेखंड, िहना, ओवा, बेलदोडा, तुळस, कपूरकत्री, िनरगुडी, दवना, पुदिना, कचोरा, उंडी, धूप, लेमन ग्रास, सोनटाका, िपवळी हळद, लाला आले, बूच, पांढरा खैरचाफा, लाल खैरचाफा, कर्णर, मस्कर दाना, भेई, सुगंधी कमळ, काळी तुळस, पांढरी तुळस, अगर, सुवासिक पायनस, कैलासपती, जपानी िमंट, जुरा, स्पायडर िलली, सब्ज, मधुमालती, लसूण तेल, कापूर.

देशभर फुलवल्या बागा...
शालेयजीवनापासून बागकामाची आवड असणारे जोशी यांनी भारतात याविषयीचे िशक्षण घेतले. परदेशातील िशक्षणाने त्यांच्या करिअरला अाकार दिला. आता देशभरातील २४ नामांिकत हाॅटेल्सच्या बागा त्यांनी फुलवल्या आहेत. याचबरोबर जेजुरीच्या डोंगरावर त्यांनी तब्बल १५ हजार झाडे लावली असून त्यात जेजुरीचा मूळ िपवळ्या रंगाला साजेशी अशी हळदमय अशा झुडपांचा समावेश आहे. मुंबईतही अनेक उद्यानेही त्यांनी सजवली आहेत.
बाेरिवलीच्या संजय गांधी उद्यानात बहरली तब्बल १५ हजार झाडे
बातम्या आणखी आहेत...