आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील पहिली लग्झरी हिल सिटी, रन वे पासून गोल्फ कोर्सपर्यंत सर्व काही!!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहारा ग्रुप द्वारे बनवलेली देशातील पहिली लग्झरी व खासगी हिल सिटी अॅम्बी व्हॅली - फाईल फोटो - Divya Marathi
सहारा ग्रुप द्वारे बनवलेली देशातील पहिली लग्झरी व खासगी हिल सिटी अॅम्बी व्हॅली - फाईल फोटो
मुंबई/पुणे- सहारा समूहाचे चेयरमन सुब्रतो रॉय यांनी नुकतेच सुप्रीम कोर्टाला सांगितले आहे की, ते 18 महिन्यात 36 हजार कोटी रूपये देऊ शकत नाही. त्यांच्या कंपनीने कोर्टात सांगितले की, जगातील कोणतीही कंपनी इतक्या कमी वेळेत एवढे पैसे देऊ शकत नाही. अब्जावधी संपत्तीचे मालक सुब्रतो रॉय भलेही आता जेलमध्ये असतील पण एके काळी त्यांच्या आलिशान लाईफ स्टाईल आणि संपत्तीबाबत सर्वत्र चर्चा होत असे. आज आम्ही तुम्हाला सहाराचे मालक सुब्रतो रॉय यांनी बनविलेल्या अॅम्बी व्हॅली टाऊनशिपबाबत सांगणार आहोत जी देशातील पहिली लग्झरी प्लॅनड हिल सिटी आहे. एवढेच नव्हे तर येथील एक-एक बंगला कोट्यावधी रूपयांना आहे.
स्वत:चा विमानतळ-
सुंदर हिरव्यागार टेकड्या, छोटी छोटी तळी (लेक) आणि लग्झरी बंगल्याशिवाय अॅम्बी व्हॅलीतील आणखी एक खास बातम म्हणजे येथील विमानतळ. हा खासगी रन वे आहे. ज्याला सहारा ग्रुपने बनवला आहे. अॅम्बी व्हॅलीत अनेक खासगी व्हीव्हीआयपी लोकांचे लग्झरी बंगले आहेत ज्यांच्याकडे खासगी जेट (विमाने) आहेत.
लोणावळ्यापासून 23 किमी आहे दूर-
अॅम्बी व्हॅली लोणावळ्यापासून 23 किलोमीटर दूरवर आहे. मुंबई-पुणे हायवेच्या ती जवळच आहे. अॅम्बी व्हॅलीपासून पुणे 87 तर मुंबई 120 किमी दूर आहे. एकून 10,600 एकरात पसरलेल्या अॅम्बी व्हॅलीचा परिसर संपूर्ण डोंगर-द-यांचा आहे.

अॅम्बी व्हॅलीत लग्झरी बंगल्याशिवाय गोल्फ कोर्स, स्पॅनिश कॉटेज, इंटरनॅशनल स्कूल, प्ले ग्राउंड, फॉर्च्यून फाउंटेन आदी सेवा-सुविधा आहेत.
वॉटर स्पोर्ट्स ते डर्ट रेस बायकिंगपर्यंत आहेत सुविधा...
अॅम्बी व्हॅलीत वॉटर स्पोर्ट्सशिवाय अॅडवेंचर स्पोर्ट्सचे अनेक इवेंट्स होतात. याशिवाय स्काय डायविंग यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
पुढे स्लाईडसच्या माध्यमातून पाहा, सहारा श्रींची अॅम्बी व्हॅलीचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...