आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India's First Master Shap Tarala Dalal Is No More

देशातील पहिल्या मास्टर शेफ तरला दलाल यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशातील पहिल्या मास्टर शेफ तरला दलाल (77) यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जगातील सर्वाधिक खपाच्या पहिल्या पाच पाककलाशास्त्र लेखकांमध्ये त्यांची ओळख होती. आजवर त्यांनी पाकशास्त्राच्या 170 पुस्तकांची लिखाण केले आहे.

तरला दलालांचा जन्म पुण्याचा. विवाहानंतर त्या मुंबईत आल्या आणि कुकरीचे क्लासेस सुरू केले. इंडियन र्मचंट चेंबरने त्यांना 2005 मध्ये ‘वुमन ऑफ द इयर’ पुरस्कार दिला, तर भारत सरकारने 2007 मध्ये ‘पद्मर्शी’ देऊन त्यांना सन्मानित केले होते. दलाल यांचे सर्व लिखाण इंग्रजीत असले तरी त्यांच्या बहुतांश पुस्तकांचे भारतीय, रशियन, डच भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे. सोनी वाहिनीवर त्यांचा ‘कुक इट अप विथ तरला दलाल’ हा कार्यक्रम सुमारे तीन वर्षे चालला.