आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२५७ लोकांचा मारेकरी लालसेतून पोहोचला मृत्युदंडापर्यंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मेमन कुटुंब देशातील पहिले दहशतवादी कुटुंब संबोधले जाते. मोठा भाऊ टायगरने बॉम्बस्फोटांची आखणी केली. याकूबने पैशाची व्यवस्था केली आणि बॉम्ब ठेवणाऱ्यांचे नियाेजनही केले.

५३ वर्षांचा याकूब रज्जाक मेमन. १२ मार्च १९९३ रोजी मुंबई बॉम्बस्फोटांत २५७ लोक ठार झाले. त्या हत्याकांडाचा हाच जबाबदार. टायगर मेमन आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने रचलेल्या या कटात याकूब महत्त्वाचा आरोपी होता. त्याने स्फोटात सहभागी लोकांना दारूगोळा, डिटोनेटर्स आदींचा पुरवठा केला. याकूबनेच स्फोटांसाठी निकटवर्तीयाकडून २१.९० लाख जमा केले होते. हल्ल्याचा कट ठरवल्यानंतर याकूब एक दिवस आधी कुटुंबातील नऊ सदस्यांना घेऊन कराचीला गेला.

खटल्याच्या अधिकृत दस्तऐवजानुसार सीबीआयने त्याला दिल्लीत ५ ऑगस्ट १९९४ रोजी अटक केली. यानंतर काही आठवड्यांत टायगरची पत्नी रुबिनासह मेमन कुटुंबातील आठ सदस्यांना देशात अटक झाली. अखेर याकूब भारतात का आला होता, असा प्रश्न उद््भवतो. विविध कारणे देऊन त्याने न्यायालयाला गुंगारा दिला होता. मात्र, आपल्या काळ्या कमाईतून जमवलेल्या संपत्तीच्या लालसेपोटी तो इथे आला होता हे यातील वास्तव आहे.

न्यायालयीन दस्तऐवज आणि काही कागदपत्रे पाहिली तर या मेमन कुटुंबातील अनेक सदस्यांनी मुंबई स्फोटानंतर गाेठवण्यात आलेल्या संपत्तीसंदर्भात मुंबई न्यायालयात चकरा मारल्याचे दिसून येते. यातील अनेक खटले सुरू आहेत. मेमन कुटुंबाची मुंबईत हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. साधारण १०० कोटी संपत्तीची माहिती आहे. माहिम येथील अल-हुसेनी बिल्डिंगमध्ये त्याचे आठ फ्लॅट होते. टायगर मेमनने तस्करीतून कमावलेले कोट्यवधी रुपये मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवले हाेते.

चार मेमन भावांमध्ये याकूब चार्टर्ड अकाउंटंट होता. त्याला टायगरने विविध क्षेत्रांत केलेल्या सर्व गुंतवणुकीची माहिती होती. तो निर्यात फर्म तिजारत इंटरनॅशनलच्या मदतीने काळा पैसा मार्गी लावत होता. टायगर मेमनच्या कमाईमध्ये सोन्या-चांदीच्या तस्करीचा मोठा वाटा होता. यातून त्याने कोट्यवधी रुपये कमावले. मेमन कुटुंबाचे माहिममध्ये कार्यालय आणि बांद्र्यात फ्लॅट होता. एवढेच नव्हे, या कुटुंबाने मोहंमद अली रोडवर अनेक दुकाने आणि घरही खरेदी केले होते.
सांताक्रुझसारख्या अति महत्त्वाच्या परिसरात या भावंडांची जमीन होती. त्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याची त्याची इच्छा होती. त्याच्या कुटुंबाची काही मालमत्ता जव्हेरी बाजारमध्ये होती. एका स्थानिक व्यावसायिकाशी त्याचा यावरून वाद होता. स्फोटानंतरच्या चौकशीत याकूब राजकारणात येण्याच्या तयारीत होता, असे पुढे आले होते. तो अनेक स्थानिक प्रकरणांत रस घेत होता. मात्र, मुंबई दंगलीमुळे तो राजकारणात जाऊ शकला नाही. याकूबच्या कुटुंबाने आपल्या बहिणी आणि सुनांच्या नावावर कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे.

याकूबने सीबीआयसमोर शरण येण्याचे मान्य केले, तेव्हा सीबीआयलाही याकूबच्या लालसेची कल्पना नसावी असे मानले जाते. सीबीआयला याकूबचा मनसुबा माहीत असावा, परंतु त्याला अटक करण्याची संधी दवडली जाऊ नये यासाठीच सीबीआयने त्याच्याशी डील केल्याचेही बोलले जाते. सर्वोच्च न्यायालयाने २१ जुलै रोजी त्याची याचिका फेटाळल्यास २५७ लोकांच्या मारेकऱ्याला फाशी होईल. मुंबईत नृशंस गुन्हा केल्यानंतर फरार झालेला अतिरेकी संपत्तीच्या लालसेतून आता फाशीपर्यंत पोहोचेल.
लेखक दिव्य भास्कर, वडोदराचे संपादक आहेत. २००७ मध्ये टाडा कोर्टाने याकूबला सुनावलेल्या शिक्षेच्या सुनावणीचे वार्तांकन त्यांनी केले आहे. त्यांनी इंडियन मुजाहिदीनसह अनेक पुस्तकांच्या लिखाणात मदत केलेली आहे.
बातम्या आणखी आहेत...