आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेनू निगमवर एका चॅनेलने घातली बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिल्लीमध्ये अाम अादमी पक्षाच्या रॅलीदरम्यान गजेंद्र सिंग या शेतकऱ्याने अात्महत्या केली असताना ‘अाप’चे नेते कुमार विश्वास यांनी वादग्रस्त वक्तव्य केले हाेते. या वक्तव्याबाबत ट्विटरवर त्याची दुसरी बाजू उलगडून सांगण्याचा प्रयत्न प्रसिद्ध गायक साेनू निगम यांनी केला हाेता. शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या या भूमिकेचा निषेध म्हणून साेनूशी संबंधित सर्व प्रकल्प तसेच चित्रपट रद्द करीत एका वाहिनीने त्याच्यावर पूर्णत: बंदी घातली अाहे.
अलीकडेच गजेंद्र सिंह यांची अात्महत्या अाणि ‘अाप’चे नेते, मुख्यमंत्री केजरीवाल यांचे तरीदेखील चालू असलेले भाषण, तसेच कुमार विश्वास यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य यावरून पेटलेला वाद शमत नाही ताेच साेनू निगम यांनी विश्वास यांच्या वक्तव्याची दुसरी बाजू सांगण्याचा ट्विटरवर प्रयत्न केला.
मात्र साेनू यांच्या ट्विटला गैरअर्थाने घेतले गेल्याने त्यांच्याबराेबर करार केलेल्या एका प्रतिष्ठित वाहिनीने त्यांच्याशी केलेले सगळे करार रद्द केले अाहेत. यावर साेनू यांनी ट्विटरवर ‘लाेकशाहीमध्ये असे कसे हाेऊ शकते?’ अशा अर्थाचे ट्विट केले असून त्यांना अनेक चाहत्यांनी पाठिंबा दिला अाहे.
बातम्या आणखी आहेत...