आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या व्यक्तीकडे आहेत कोट्यवधींचे शेअर्स तरीही झगडतायेत रुपया-रुपयासाठी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजयपत सिंघानिया. - Divya Marathi
विजयपत सिंघानिया.
मुंबई- कोट्यवधींचे शेअर्स असूनही रुपया-रुपयासाठी झगडण्याची वेळ देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेल्या एका व्यक्तीवर आली आहे. रेमंड लिमिटेडचे मालक विजयपत सिंघानिया यांनी असा तसा आरोप मुलगा गौतम सिंघानिया यांच्यावर केला आहे. गौतम सिंघानिया रेमंड कंपनी स्वत:च्या जहागिरीप्रमाणे चालवत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे.
 
मुंबईतील ग्रँड पराडी सोसायटीमध्ये विजयपत सिंघानिया मुंबईतील ग्रँड पराडी सोसायटीमध्ये राहतात. त्यांनी मलबार हिल येथील ड्युपलेक्स घराचा ताबा मिळवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ते आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी कोर्टात दिली आहे.

त्यांनी ज्या घरासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्या इमारतीचे बांधकाम 1960 मध्ये करण्यात आले. ही इमारत त्यावेळी 14 मजल्यांची होती. यानंतर या इमारतीमधील 4 ड्युप्लेक्स रेमंडची उपकंपनी असलेल्या पश्मिना होल्डिंग्सला देण्यात आले. 2007 मध्ये कंपनीने इमारतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी इमारतीमध्ये विजय सिंघानिया, गौतम सिंघानिया, वीणादेवी (सिंघानिया यांचे दिवंगत बंधू अजयपत सिंघानिया यांची पत्नी) आणि त्यांचे पुत्र अक्षयपत आणि अनंतपत सिंघानिया यांना प्रत्येकी 1-1 ड्युप्लेक्स घर देण्याचा करार झाला होता. यासाठी 9 हजार प्रति फीट दराने किंमत मोजावी लागणार होती.
 
अपार्टमेंटमधील स्वत:चा हिस्सा मिळवण्यासाठी वीणादेवी आणि अनंतपत यांनी आधीच एक संयुक्त याचिका कोर्टात दाखल केली आहे. तर अक्षयपत यांनी या प्रकरणात एक स्वतंत्र याचिका दाखल केली आहे. विजयपत सिंघानिया यांनी त्यांची सर्व संपत्ती मुलाच्या नावे केली असल्याचे त्यांचे वकील दिनयर मेडन यांनी कोर्टात सांगितले. मात्र मुलगा त्यांची काळजी घेत नसल्याची माहितीही वकिलांनी कोर्टाला दिली. ‘सिंघानिया यांनी कंपनीतील त्यांच्या मालकीचे समभाग मुलाला दिले आहेत. या समभागांची किंमत 1 हजार कोटी इतकी आहे. मात्र आता गौतम सिंघानिया त्यांची जबाबदारी घेत नाहीत, अशी माहिती वकिलांनी कोर्टात दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...