आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India\'s Smallest Hill Station Mathron Near Mumbai

महाराष्‍ट्र: माथेरान प्रदूषणरहित हिलस्‍टेशन, हजारो पर्यटकांचे ठरत आहे आकर्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई आणि पुण्याच्या पर्यटकांना नेहमीच आ‍कर्षीत करणारे पर्यटनस्‍थळ म्‍हणून परिचित असलेल्‍या माथेरानच्‍या हिल स्‍टेशनला मान्‍सूच्‍या निमि‍त्ताने देशभरातील पर्यटक भेटी देत आहेत. समुद्रसपाटीपासून साधारण 800 मीटर उंचीच्या पठारावर माथेरान वसलेले आहे. हिल स्‍टेशन बरोबरच घनदाट झाडी आणि लाल माती पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. शिवाय मान्‍सूनच्‍या पावसात ढगातील आनंद माथेरानमध्‍ये गेलेल्‍या पर्यटकांना घेता येतो.
महाराष्‍ट्रातील रायगड जिल्‍ह्यातील माथेरान हिल स्‍टेशन नैसर्गिक सौंदर्यामुळे नेहमी चर्चेत असते. प्रदूषणरहित हिल स्‍टेशन म्‍हणून या हिल स्‍टेशनला दर्जा मिळाला आहे. शिवाय देशातील सर्वात छोटे हिल स्‍टेशन म्‍हणून याची ओळख आहे. हिल स्‍टेशनच्‍या परिसरातमध्‍ये पेट्रोल आणि डीजल वर चालणा-या वाहनांना बंदी घालण्‍यात आलेली आहे. पर्याय म्‍हणून टांगा, घोडे, सायकल रिक्‍श्‍याचा वापर केला जातो.

माथेरानला जाण्‍याचा मार्ग-
माथेरानच्‍या सर्वाज जवळ 9 किलोमिटर अंतरावर नेरळ रेल्‍वेस्‍टशन आहे. या स्‍टेशनच्‍या पुढे वाहने नेता येत नाहीत. या स्‍टेशवर जाण्‍यासाठी सर्वात चांगला पर्याय म्‍हणून टॉय ट्रेनचा वापर करणे योग्‍य आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा माथेरानची नैसर्गिक छायाचित्रे...