आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मुंबईत आहे देशातील सर्वात उंच इमारत, बाल्कनीतून दिसतो समुद्राचा नजारा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र आपल्या विकासाचे पुढील टप्पे गाठताना दिसतो. अर्थव्यवस्था असो की पायाभूत सुविधांच्या बाबतीत असो महाराष्ट्राने देशाच्या उर्वरित राज्याअगोदर मोठी मजल नेहमीच मारत आला आहे. नवे व्यवसाय, पार्क, पायाभूत विकासाचे प्रोजेक्ट्सपासून औद्योगिक विकासातही मोठी झेप घेतली आहे. बांधकाम क्षेत्रातही मुंबई-पुणे-नाशिकसारख्या शहरात मोठी तेजी आहे. मुंबईत तर ऊंचच ऊंच टावर उभे राहत आहेत. मुंबईत बांधकाम क्षेत्राने अनेक विक्रम मोडले आहेत. चांगल्या प्रतीचे घर घ्यायचे झाल्यास मुंबईत एक, दीड कोटींच्या आत घर मिळत नाही. आज आम्ही तुम्हाला मुंबईतील अशा एका इमारतीबाबत सांगणार आहे जी देशात सर्वाधिक उंच इमारत ठरली आहे. त्या इमारतीचे नाव आहे 'इम्पिरियल ट्विन टावर्स'. तर चला मग वाचू या या इमारतीबाबत....

254 मीटर ऊंच आहे इमारत- इम्पिरियल ट्विन टावर्स भारतातील सर्वांत ऊंच इमारत आहे. या दोन्ही इमारतीची ऊंची आहे 254 मीटर. मुंबईतील ताडदेव भागात उभी असलेली ही इमारत 2010 साली बांधण्यात आली आहे.

60 मजली आहे इमारत- इम्पिरियल ट्विन टावर्स भारतातील सर्वात मोठी रहिवासी इमारत आहे. यात एकून 60 मजले आहेत. इमारततील 12 ते 39 मजल्यांपर्यंत 3 आणि 4 BHK फ्लॅट आहेत. तर, 40 ते 47 मजल्यावर 4BHK चे डुप्लेक्स आणि 5 BHK फ्लॅट आहेत. 49 ते 54 मजल्यावर 5 BHK डुप्लेक्स आहेत. इतर मजल्यांवर मल्टी स्टोरी पार्किंग सुविधा तर काही मजल्यावर क्लब हाऊस बांधली आहेत.

बाल्कनीमधून दिसतो समुद्राचा नजारा- इम्पिरियल ट्विन टावर्सची ऊंचीच इतकी आहे की तेथून समुद्राचा नजारा संपूर्ण जसाच्या तसा दिसतो. दोन्ही टावर्सवर एक खास बाल्कनी बनविली आहे जेथून सर्व समुद्राचा नजारा पाहू शकता.
हफीजने डिझाईन केली आहे इमारत- इम्पिरियल ट्विन टावर्सचा प्रोजेक्ट शापूर्जी पल्लोंजी यांनी बनविला आहे. बिल्डिंगला जाने माने आर्किटेक्ट हफीज काँट्रेक्टरने डिझाईन केले आहे. हफीजने देशातील अनेक बड्या इमारतीचे डिझाईन बनविले आहे.

पुढे पाहा, या देखण्या इमारतीचे PHOTOS....