आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India’S Temples Guard Their Gold From Governmen

भारतातील मंदिर - घरांमध्ये अब्जांवधी रुपयांचे सोने, जाणून घ्या कोणत्या मंदिरात किती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सध्या नवरात्र उत्सवाची धामधूम सगळीकडे पाहायला मिळत आहे. देवीच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. दर्शनानंतर भाविक आपापल्या इच्छेनुसार दान देतात. कोणी सोने तर कोणी पैशांच्या स्वरूपात दुर्गेच्या चरणी भेट अर्पण करतो. सध्या मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात दान जमा होत आहे. (तुळजापूर मंदिराच्या मौल्यवान दानावर डल्ला) तिरुपती बालाजीनंतर जम्मू-काश्मिरच्या वैष्णो देवी मंदिरात सर्वाधिक भाविक दर्शनासाठी जातात. नवरात्र उत्सवात भक्तांची संख्या आणखी वाढते. दरवर्षी येथे 80 लाख भाविक येतात.

वैष्णोदेवी मंदिर संपत्तीच्या तुलनेत देशात पाचव्या क्रमांकावर आहे. या मंदिरात सोने भेट देण्याची परंपरा आहे. मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकेची नजर अशाच प्रसिद्ध मंदिरांमधील सोन्यावर आहे. नुकतेच रिझर्व्ह बँकेने मंदिरांना पत्र पाठवून त्यांच्याकडील सोन्याची माहिती मागितली आहे. अनेक मंदिरांनी रिझर्व्ह बँकेच्या या मागणीचा विरोध केला आहे. वर्ल्ड गोल्ड काँऊसीलच्या अंदाजानुसार देशातील मंदिर आणि घरांमध्ये 20 हजार टन सोने जमा आहे. सध्याच्या दरानुसार या सोन्याची किंमत जवळपास 84 अब्ज अमेरिकन डॉलर (साधारण 52 खर्व रुपये) आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, मुंबईतील सिद्धीविनायकसह कोणत्या मंदिरात किती सोने आहे.