मुंबई- विराट कोहलीने वरळीत ओमकार-1973 मध्ये एक लग्झरी फ्लॅट अपार्टमेंट खरेदी केला आहे. समुद्राचा व्यू असलेल्या या अपार्टमेंटमधील 35 व्या फ्लोर वर 7, 171 स्क्वेयर फूटाचा हा फ्लॅट विराटने 34 कोटींना बुक केला आहे. विराट हा या अपार्टमेंटमध्ये युवराज सिंगचा शेजारी असेल. युवीने 2014 मध्ये येथील 29 व्या मजल्यावर फ्लॅट बुक केला होता. मुंबईत ओपन व्यू स्पेस हवा होता विराटला....
- मिळालेल्या माहितीनुसार, विराट मागील काही काळापासून मुंबईत ओपन व्यू असणारा बंगला खरेदी करू इच्छित होता.
- विराटच्या निकटवर्तियांनी सांगितले की, बुक केलेल्या या नव्या फ्लॅटमध्ये 5 शानदार बेडरूम आहेत.
- मात्र, याबाबत ओमकार रियालिटी & डेव्हलपर्सने काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
2018 पर्यंत तयार होईल फ्लॅट-
- प्रोजेक्ट-1973 या इमारतीचे 30 व्या मजल्याचे काम डिसेंबर, 2016 पर्यंत पूर्ण होईल.
- तर, विराट कोहलीला 2018 मध्ये या अपार्टमेंटचा ताबा देण्यात येईल.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, कसा असणार आहे विराटचा लग्झरी फ्लॅट...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)