आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

100 वी जयंती: प्रियदर्शिनी, गुंगी गुडिया, दुर्गा ते आयर्न लेडी, वाचा इंदिराजींचा प्रवास...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९ नोव्हेंबर १९१७ रोजी इंदिरा गांधी यांचा जन्म झाला. - Divya Marathi
१९ नोव्हेंबर १९१७ रोजी इंदिरा गांधी यांचा जन्म झाला.

19 नोव्हेंबर 1997 रोजी इंदिरा गांधी यांचा जन्म झाला. आज त्यांची 100 वी जयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने आम्ही इंदिराजींच्या जीवनातील घटना, घडामोडी, जुन्या आठवणींना उजाळला देण्याचा प्रयत्न केला आहे...

 

19 नोव्हेंबर 1917 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घरी इंदिरांना इंदू याच टोपणनावाने सर्व आवाज देत असे. नेहरूंची ती एकुलती एक मुलगी होती.
इंदिरांचे नाव त्यांचे आजोबा पंडित मोतीलाल नेहरू यांनी ठेवले होते. इंदिरा नावाचा अर्थ होतो, नितळ कांती, लक्ष्मी आणि शोभा. त्यांचे आणखी एक नाव चर्चेत होते-प्रियदर्शिनी. हे नाव त्यांना रविंद्रनाथ टागोर यांनी दिले होते. इंदिराजी जेव्हा राजकारणात आल्या, तेव्हा त्या अबोल होत्या. विरोधी पक्ष त्यांना गुंगी गुडिया म्हणत असे. 1971 च्या युद्धात पाकिस्तानचे तुकडे झाल्यानंतर त्यांना ‘दुर्गा’ म्हणण्यात येऊ लागले. 1974 साली अण्वस्त्र चाचणी घेतल्यानंतर त्या ‘आयर्न लेडी’ बनल्या. 

 

खऱ्या अर्थाने इंदिराजी वयाच्या 5 व्या वर्षापासून सक्रीय झाल्या. तेव्हा त्यांनी स्वदेशी आंदोलनापासून प्रेरणा घेऊन इंग्लंडहून मागवलेली आवडती बाहुली जाळून टाकली. वयाच्या 25 व्या वर्षी सर्वांचा विरोध पत्करुन त्यांनी फिरोज गांधी यांच्याशी विवाह केला. हा त्यांच्या आयुष्यातील मोठा निर्णय होता. मात्र, आणीबाणी लादण्याचा आयुष्यातील सर्वात अप्रिय असा निर्णय होता. देश अजूनही त्यांच्यावर तितकेच प्रेम करतो.

 

 बोल इंदिरा गांधींचे

 

देशासाठी...

 

एका देशाची ताकद तो स्वत: काय करू शकतो यात नसून तो दुसऱ्याकडून काय उधार घेतो यावर आहे.

 

राजकारणावर...

 

माझे सर्व खेळ राजकारणी असायचे. मी जोन ऑफ आर्कसारखी होते. प्रतिष्ठा पणाला लावली जायची.

 

भ्रष्टाचाराबाबत...

 

पैशाशिवाय काम करत नाहीत, अशा मंत्र्यांपासून सावध राहावे. ते पैशासाठी काहीही करू शकतात.

 

हिंसेबाबत...

 

माझा मृत्यू हिंसाचाराने झाला तर मला वाटते, हिंसा मारेकऱ्याच्या विचारात आणि कर्मात असेल.

 

घरातील वातावरण आजीच्या मूडवर अवलंबून असायचे -प्रियंका

 

आजीचा मूड कसा आहे? हे डॉक्टर माथूर साहेबांकडून कळत असे. सर्व जण त्याप्रमाणे दिवसभरात कसे वागायचे हे ठरवत असत.

 

(इंदिराजींचे फिजिशियन डॉ. माथूर यांच्या ‘द अनसीन इंदिरा गांधी’ या पुस्तकात प्रियंका गांधी यांनी ही माहिती दिली.)

 

पुढील स्लाईडमध्ये पाहा, इंदिरा गांधींचे दुर्मिळ फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...